आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Transport Corporation Medical Certificate Issue

आरोपी सीएस, डॉक्टरांसह ३६ जण फरार; जामिनासाठी धावपळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यपरिवहन महामंडळाच्या अकोला विभागात कार्यरत असलेल्या चालकांना बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन महामंडळाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एसटीचे तत्कालीन अकोला विभाग नियंत्रक, औरंगाबादचे कामगार अधिकारी, अकोला वाशीम येथील जिल्हा शल्यचिकित्सक (सीएस), तसेच मानसेवी डॉक्टरांसह ३६ जणांविरुद्ध बुधवारी खदान पोलिसांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. हे सर्व आरोपी फरार आहेत.
अकोला विभागातील कार्यरत चालकांना रंगअंधत्वाचा (कलर ब्लाइंडनेस) आजार दाखवून त्यांना बनावट दस्तऐवजाद्वारे सुरक्षा रक्षकपदी नियुक्ती देऊन महामंडळाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी वर्षभरापासून सुरू होत्या. अखेर बुधवारी याप्रकरणी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केल्यानंतर ३६ कर्मचारी, अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील अकोला वाशीम आगारात कार्यरत असलेल्या २६ चालकांना रंगअंधत्वाचा आजार दाखवण्यासाठी अकोला विभागाचे तत्कालीन विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी, औरंगाबादचे कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, सहायक कर्मचारी अधिकारी रमेश एडके, लिपिक प्रभाकर गोपनारायण, मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. व्ही. तारे, सीएस आर. एच. गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, वाशीमच्या सीएस डॉ. सुरेखा मेंढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही. डी. क्षीरसागर यांनी संगनमताने बनावट दस्तऐवज तयार केले. त्यानंतर या २६ चालकांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून त्यांना राज्य सुरक्षा रक्षक पदावर नियुक्ती दिली. परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी हे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी पुढाकार घेतला, तर डॉक्टरांशी देवाणघेवाण करून त्यांचे बनावट प्रमाणपत्र तयार झाल्यानंतर या २६ चालकांना सुरक्षा रक्षकपदी नियुक्ती दिली.

यांच्या शोधात आहेत पोलिस : मुंबईमध्यवर्ती कार्यालयाचे विभाग नियंत्रक प्रशांत प्रभाकर भुसारी, औरंगाबादचे कामगार अधिकारी लक्ष्मीकांत विठ्ठल गवारे, सहायक कर्मचारी वर्ग अधिकारी रमेश दत्तात्रय एडके, लिपिक प्रभाकर पंढरीनाथ गोपनारायण, रापमचे मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.व्ही. तारे, अकोला सर्वोपचार रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एच. गिरी, सर्वोपचारच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, वाशीमच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. हेमंत सिसोदिया, डॉ. व्ही. डी. क्षीरसागर यांच्यासह सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेले एम. टी. तायडे, एन. बी. चव्हाण, शालिग्राम मापारी, एस. व्ही. खुमकर, व्ही. बी. कोगदे, एस. बी. पवार, जी. ए. इंगोले, एम. यू. राठोड, एस. यू. टाले, एस. पी. बुटे, सी. ए. ठाकरे, आर. एन. रोडे, एस. बी. फड, एस. व्ही. गावंडे, एम. आर. पोफळे, डी. आर. चव्हाण, पी. के. जाधव, शेख महबूब, एस. एम. विटकरे, श्रीराम एस. मापारी, अब्दुल नईम, व्ही. एस. धनकर, व्ही. बी. तिवाले, डब्ल्यू. जे. आवारे, ए. आर. धनोकार, एस. एन. खानबरड यांचा शोध पोलिस घेत आहेत.

असा झाला घोळ
एका चालकाला वैद्यकीय तपासणीसाठी मुंबई येथे पाठवले होते. त्यात त्याला रंगअंधत्व नसल्याचे स्पष्ट झाले. याच्या चौकशीसाठी वरिष्ठस्तरावरून परिवहन महामंडळाने मुंडीवाले समिती गठित केली. या समितीने अकोल्यात दाखल होऊन विभागातील आगारांतील सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत असलेल्या २६ चालकांची वैद्यकीय तपासणी केली, तसेच त्यांच्या रंगअंधत्वाच्या प्रमाणपत्रासह सर्व दस्तऐवज जप्त केले. वैद्यकीय तपासणीत २६ पैकी एकाही चालकाला रंगअंधत्व नसल्याचे उघड झाले, तर जिल्हा शल्यचिकित्सकांकडून प्राप्त केलेले रंगअंधत्वाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले.