आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी कर्जमाफीविरोधी वक्तव्य करणारे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या पुतळ्याचे शिवसेनेतर्फे दहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नापिकी आणि शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत अशोभनीय वक्तव्य करणारे रिझर्व बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांचा शिवसेनेकडून निषेध करण्यात आला. आणि त्यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. शुक्रवार, एप्रिल रोजी सायंकाळी मदनलाल धिंग्रा चौकात आंदोलन करण्यात आले. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर त्यांना घाणेरडी सवय लागेल, महाराष्ट्राचा ताळेबंद त्यामुळे बिघडेल त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ नये, असे ऊर्जित पटेल यांनी वक्तव्य केले होते. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी सर्वांनी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. आंदोलन प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख श्रीरंग पिंजरकर, जिल्हा प्रमुख नितीन देशमुख, शहर प्रमुख अतुल पवनीकर, तालुका प्रमुख विकास पागृत, नगरसेवक मंगेश काळे, अश्विन नवले, प्रदीप गुरुखुद्दे, सागर भारुका, शशी चोपडे, नकुल ताथोड, योगेश गिते, शरद तुरकर, संजय भांबेरे, भास्कर अंभोरे, गजानन बोराळे, केदार खरे, सूरज सोळंके, रामचंद्र घावट, अभिषेक खडसाळे, अनिल निकामे, सुनील गोंडचवर, कमलेश गावंडे, राहुल कराळे, किशोर ठाकरे, नंदू ढोरे, दिनकर सुरोशे, नामदेवराव तायवाडे, सुभाष डाबेराव, अविनाश मोरे, विजय दवंडे, लक्ष्मण पंजाबी, सुनील दुर्गिया, अश्विन पांडे, सोनू वाटमारे, मुन्ना भाकरे, बबलू उके, मुन्ना भागडे, अक्षय झटाले, संजय भांबेरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...