आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गाेदामाच्या बांधकामासाठी मिळालेले १९ लाख गेले परत, तेल्हारा, पातूरसाठी झाला हाेता निधी मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - इच्छाशक्ती अभावी नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकास निधीअंतर्गत तेल्हारा पातूर येथील शासकीय गाेदामासाठी मंजूर झालेल्या निधीपैकी १९ लाख १९ हजार ४४४ रुपये अखर्चित राहिल्याने ही रक्कम शासनाकडे परत गेल्याचा प्रकार उजेडात अाला अाहे. याबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाने साेमवारी निर्णय जारी केला. अाता निधी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हयांमध्ये खर्च हाेणार अाहे.

जिल्हा नियाेजन समितीच्या बैठकांमध्ये तर लाेकप्रतिनधींमध्ये विकास कामांवरुन खडाजंगी झाल्याचे प्रकारही घडले अाहेत. बैठकांमध्ये िनधी इतर कामांसाठी वळवणे, कामे रखडणे या प्रकारांवरुन लाेकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धडल्याचे िदसून अाले. रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्यात येतील, असे वेळ मारून नेण्याचे उत्तरेही अधिकारी नेहमीच देतात.
दरम्यान शासनाने अकाेला िजल्ह्यातील पातूर तेल्हारा येथे शासकीय गाेदाम बांधण्यासाठी िनधी मंजूर केला. मात्र हा िनधी िवहित मुदतीत खर्च करण्यात अाला नाही. परिणामी हा िनधी पश्चिम महाराष्ट्र अाणि पालघर िजल्हयातील सात गाेदामांवर खर्च हाेणार अाहे.

शासनअादेशाला केराची टाेपली : शासनाने१५ जुलै २०१६ राेजी सन २०११ ते १२ अािण २०१४ ते २०१५ यमध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात अालेल्या काही गाेदाम बांधकामास िनधी िवतरित करण्याचा िनर्णय घेतला. पातूर , तेल्हारा येथे गाेदाम बांधकामाचे िनयाेजन करण्यात अाले. त्यानुसार तेल्हारा येथे कामही सुरु झाले. हा िनधी खर्च करण्यासाठी शासनाकडून वारंवार पाठपुरावाही करण्यात अाला. मात्र या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करण्यात अाले. परिणामी िनधी इतर साेलापूर, पालघर अहमदनगर िजल्हयात गाेदाम बांधकामांवर खर्च करण्याचा िनर्णय शासनाने घेतला अाहे.

सत्ताधारीहतबल : िजल्हयातभाजपचे चार अामदार एक खासदार अाहे. पालकमंत्रीही भाजपचेच अाहेत. मात्र तरीही िजल्ह्यातील सभागृहासह इतरही कामे प्रशासकीय मंजुरीमुळे रखडलेली असल्याचे समजते. भाजपच्या लाेकप्रतिनिधींमध्ये असलेले अंतर्गत राजकारण, चढाअाेढ लपून राहलेली नाही. एक तर िवकासकामांसाठी लाेकप्रतिनिधींनाच अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करावा लागताे, िकंवा कामेच हाेत नसल्याने िनधीच परत जाताे. त्यामुळे सत्ता अाल्यास अकाेल्याचा सर्वांगिण िवकास असे, िवधानसभा िनवडणुकीच्या काळात प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी िदलेले अाश्वासन अाता त्यांनी अाता मुख्यमंत्री म्हणून तरी पाळावे, अशी अपेक्षा अाता नागरिकांमधून व्यक्त हाेत अाहे.

िनधी अामच्या जवळ अाहे
^गाेदामांचीकामेप्रगतीपथावर अाहे. झालेल्या बांधकामांची देयके िदलेली अाहेत. िनधी अामच्या जवळ अाहे.'' मिथिलेशचाैहान, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम िवभाग.

देयक दिल्याने अखर्चित
^गाेदामासाठीचािनधीसार्वजनिक बांधकाम िवभागाला िदला हाेता. मात्र िवभागाने देयक िदले नाही. त्यामुळे िनधी अखर्चित रािहला. याला बांधकाम िवभागच जबाबदार अाहे.'' अनिलटाकसाळे, िजल्हा पुरवठा अधिकारी.

निधी काेठून अाणणार?
तेल्हारा येथील गाेदामासाठीचा १९ लाखाचा िनधी २० जुलै राेजी प्राप्त झाला. पुरवठा िवभागाने हा िनधी २१ जुलै राेजीच बांधकाम िवभागाकडे हस्तांरित केला. या गाेदामाचे इलेक्ट्रीक फ्लाेअरींगचे काम रािहले अाहे. अाता िनधी परत गेल्याने गाेदामाचे उर्वरित काम कसे हाेणार अाहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत अाहे.


बातम्या आणखी आहेत...