आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कमरेला दोर बांधून 'ती' करते डवरणी, मंगरुळपीर येथील घटना...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगरुळपीर- शेती करण्याच्या पद्धतीमध्ये खूप सुधारणा झाल्या. आधुनिक यंत्रसामुग्री आली. परंतु पोटाला चिमटा घेऊन शेती करणारे शेतकरीही याच समाजात आहेत. बैल, यंत्र परवडत नाही म्हणून कमरेला दोर बांधून पती, पत्नी डवरणीची कामे करताना दिसतात. हाही चर्चेचा विषय होतो.

तालुक्यातील फाळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी दीपक शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची पत्नी रंजना डवरणीपासून शेतीची सर्व कामे करू लागते. शिंदे यांच्याकडे एकर शेती आहे. परंतु ती देखील तीन ठिकाणी विखुरलेली. कुटुंबामध्ये कोणीही शासकीय सेवेत नाही. रंजनाबाई नववीपर्यंत शिकल्या. तर त्यांचे पती बारावी झालेले. पती टेलरिंगची कामे करुन उदरनिर्वाह चालवतो. दोन वर्षांपूर्वी मुलीचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आहे.
घरची परिस्थिती यथातथा आहे. शेतीला तर नांगरणी, पेरणी अशा प्रत्येक टप्प्यावर पैसा लागतो. मजुरी द्यायची कशी ही समस्या असल्याने शिंदे दाम्पत्याने स्वत:च सर्व कामे करण्याचे ठरवले. त्यामुळे डवरणीची कामे दोघेही करतात. एका दिवसात एक एकर डवरणी होते. त्यांच्या धाडसाचे गावकरी कौतुक करत आहे. कास्तकारी सोपे काम नाही. शेतात सारखा घाम गाळावा लागतो तेव्हा कुठे मोत्याची कणसे दिसू लागतात. त्यांच्या मेहनतीला फळ मिळतेच हा विश्वास त्यांना आहे. श्रमाला पर्याय नाही. तसेच कोणावर अवलंबून राहावे लात नाही असे शिंदे म्हणतात.
शेतामध्ये डवरणी करताना शिंदे दाम्पत्य.
बातम्या आणखी आहेत...