आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी संपावर, केली निदर्शने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - अनुकंपासेवा भरती विना अट करण्यात यावी, वैद्यकीय दृष्ट्या अपात्र असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यास शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, सर्व विभागातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, गृह खात्याप्रमाणे सदर कर्मचाऱ्यांना शासकीय वसाहत बांधून देण्यात यावे, सातवा वेतन आयोग फरकासह मंजूर करण्यात यावा, यासह इतर मागण्यासाठी राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने २१ २२ सप्टेंबर असे दोन दिवस संपाचे हत्यार उपसले आहे. या उपरही मागण्या मान्य झाल्यास २७ सप्टेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात येणार आहे. 
 
भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वात हा संप पुकारण्यात आला आहे. काही वर्षापासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यासाठी कर्मचाऱ्यांनी अनेक वेळा आंदोलन केली आहेत. परंतु अद्यापही शासनाने त्यांच्या मागण्याची दखल घेतली नाही. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्यामध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. महानगर पालीका, नगर पालीका नगर पंचायती मधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनीच पेंशन योजना सुरू करण्यात यावी, महसुल कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यामध्ये समाविष्ट करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान काल २१ सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकारी कृषी अधिक्षकास मागण्याचे निवेदन देण्यात आले. यया संपात नरेंद्र नांदे, एस.के. जाधव, ज्ञानदेव खराटे, सिंधुताई जाधव, भारती ठाकुर, सविता आराख, डी.जी. विणकर, डी.जी. देवकर, वाघ, कदम यांच्यासह महसुल कृषी विभागातील शेकडो चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी झाले आहेत. 
 
संपाला तहसीलदार संघटनेचा पाठिंबा 
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या संपाला तहसीलदार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सुरेश बगळे नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवकार यांनी निदर्शन स्थळी येवून पाठींबा दिला आहे. 
बातम्या आणखी आहेत...