आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थांसाठी पोलिसांचा ‘सतर्क व्हा’ खास उपक्रम, एसपी करणार मार्गदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- इंटरनेटस्मार्टफोनच्या अतिवापरामुळे बालवयात असताना विद्यार्थी दशेतच मुले गुन्हेगारीकडे कसे वळतात. त्यांचे पाऊल वेळीच अडवण्यासाठी पोलिसांनी सतर्क व्हा’ हा उपक्रम सुरू करत आहेत. त्यासाठी खदान पोलिसांनी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. तसे पत्र शाळांमध्येसुद्धा पाठवले आहे. 

खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार गजानन शेळके यांनी पुसद येथे ठाणेदार असताना सर्वप्रथम अशा प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या. त्यातून नवी पिढी घडण्यासाठी सकारात्मक फायदा होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांनी अकोल्यात हा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. त्यानुसार फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी ११ वाजता मलकापूरमधील जानोरकर मंगल कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अप्पर पोलिस अधीक्षक विजयकांत सागर, एसडीपीओ उमेश माने पाटील, खदानचे ठाणेदार गजानन शेळके, साम अॅकेडमीचे संचालक प्रा. सागर चौथे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत बालगुन्हेगारीकडे विद्यार्थांची वाटचाल कशी होते, इंटरनेट स्मार्ट फोन यांच्या वापरामुळे घडणारे गंभीर गुन्हे कोणते, वाईट संगतीमुळे विद्यार्थांकडून नकळत घडणारे सदोष गुन्हे कोणते, त्यावरील कारवाईचे स्वरूप, ब्रेन वॉश करून विद्यार्थांचे अपहरण विविध गुन्ह्यांसाठी त्यांचा वापर कसा केला जातो याचे स्पष्टीकरण, पालकांनी कोणती खबरदारी घ्यावी या बाबत विद्यार्थांना पोलिस अधिकारी यांच्यातर्फे गुन्हेगारी जगताची वास्तविक माहिती या कार्यशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे गुन्हेगारी प्रतिबंधक उपाययोजनास हातभार लागणार आहे. पर्यायाने गुन्हेगारी नियंत्रणास हातभार लागेल, कार्यशाळेत मुख्याध्यापकांनी आपल्या विद्यार्थांना उपस्थितीत ठेवावे असे आवाहन ठाणेदार गजानन शेळके यांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...