आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसमधून पडल्यामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखली - धावत्या एसटी बसचा दरवाजा उघडल्याने बसमधील १८ वर्षीय विद्यार्थ्यांचा रस्त्याच्या खाली पडून मृत्यू झाल्याची घटना १४ डिसेंबर रोजी चिखली ते जाफ्राबाद मार्गावर सांजोळना गावाजवळ घडली. एस.टी.ने प्रवास करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एस.टी. विभागानेदेखील सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. असाच दैनंदिन प्रवास करीत विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील सांजोळनाला येथील रवींद्र तुकाराम रदाळ वय १८ वर्ष हा विद्यार्थी जाफ्राबाद तालुक्यातील वरुड येथे शिक्षण घेत होता. आज १४ डिसेंबर रोजीचा प्रवास त्याचा अखेरचा ठरला.

रवींद्र तुकाराम रदाळ हा विद्यार्थी चिखलीवरून वरुडकडे जाणाऱ्या बस क्रमांक एम.एच. १४ बी.टी. ४५३६ मध्ये बसला. सांजोळनापासून काही किलो मीटर अंतरावर बस पुढे गेली असतांना रस्ता खराब असल्याने गाडीने जोरदार हेलकावे घेतले. दरम्यान, एसटीच्या गेटला वाहकाने पट्टी टाकलेली नसल्याने दरवाजा उघडला गेला दरवाजाजवळ उभा असलेला विद्यार्थी रवींद्र रदाळ हा बसच्या बाहेर फेकल्या गेला. मात्र त्याच वेळी त्याचा एक पाय दरवाजामध्ये अडकल्यामुळे रस्त्याने फरफटत गेला. काही अंतरावर पाय निसटून तो एसटीच्या चाकाखाली आल्याने जखमेतून रक्तस्त्राव होत होता. दरम्यान, त्याला त्वरित चिखली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मावळली. रवींद्रच्या अपघाती मृत्युने सांजोळनाला येथे शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी आहेत.
रवींद्रच्या मृत्यूला जबाबदार कोण?
रवींद्रच्या अपघाती मृत्यूला जबाबदार कुणाला धरावे? हा मोठा प्रश्न आहे. खराब रस्ते असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग? दरवाज्याला पट्टी लावणारा वाहक? नेमकी जबाबदारी कुणाची हा प्रश्न आता अनुत्तरीत आहे.

मदत जाफ्राबाद डेपोकडे
^घटनास्थळ जाफ्राबाद आगारांतर्गत येते. त्यामुळे मृतकाच्या नातेवाइकांना मदत देणे हे जाफ्राबाद आगार ठरवेल. ते अहवाल कसा पाठवतात, त्यावरून चालक वाहकावर कारवाई करण्यात येईल. अरुण इंगळे, आगार प्रमुखचिखली.
बातम्या आणखी आहेत...