आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शालेय विद्यार्थ्यांना जुंपले साफसफाईच्या कामाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - एकीकडे शिक्षणापासून वंचित असलेल्या शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम शासनाकडून केले जात आहे. तर दुसरीकडे शाळेत विद्यार्जनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांकडून शाळेच्या स्वच्छतेचे काम करून घेतले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

येथील शिवाजी वेस भागातील नगरपालिकेच्या भारतरत्न राजीव गांधी शाळा क्रमांक तीनमध्ये शाळेच्या साफसफाईसाठी शिपायाची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, त्याच्याकडून सफाईचे काम करून घेता शाळेत शिकण्यासाठी येणा-या काही विद्यार्थ्यांकडून सातत्याने खोल्या परिसराची साफसफाई करून घेण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर वर्गात विद्यार्थ्यांना बसण्यासाठी असलेल्या पट्ट्या त्यांनाच हाताने टाकाव्या उचलाव्या लागत आहेत. मागील अनेक महनि्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मात्र, या गंभीर बाबीकडे मुख्याध्यापक शिक्षण विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे दिले जावेत, मात्र त्यालाही मर्यादा असावी, अशा प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांकडून सातत्याने साफसफाईचे काम करून घेतले जात असल्याने पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

साफसफाईसारखी कामे करून घेतली जात असल्याने अनेक पालक मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नसल्याचे दिसत आहे. अशा प्रकारामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याने त्या शाळा बंद करण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाला घ्यावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या तीन शाळा बंद करण्यात आल्या आहेत. त्या शाळेमधील विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून सातत्याने अशी कामे करून घेण्यात आल्यास पालक त्यांना अन्य शाळांमध्ये प्रवेश देतील. परिणामी या शाळेची पटसंख्या कमी हाेऊन ही शाळाही बंद करण्याची वेळ येईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. प्रशासनाने याबाबत दखल घेऊन हा प्रकार बंद करावा, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे.

नगरपालिकेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळण्याची पालकांची अपेक्षा
शहरातीलनगरपालिकेच्या शाळांमधून दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु विद्यार्थ्यांकडून शिक्षणाऐवजी साफसफाईची कामे करून घेतली जात आहेत. या प्रकाराकडे नगरपालिकेच्या शिक्षण विभागाने लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

कारवाई करण्याच्या सूचना देणार
याप्रकाराची खरी माहिती जाणून घेण्यासाठी या शाळेला भेट देणार आहे. खरोखर असा प्रकार झाला असल्यास संबंधितावर कारवाई करण्याची सूचना मुख्याधिकारी शिक्षण विभागाच्या अधिका-यांना देणार आहे. यापुढे विद्यार्थ्यांना ताटातच खिचडी देण्यात यावी, अशा सूचना शाळेच्या मुख्याध्यापकांना दिल्या आहेत. संतोषदेशमुख, शिक्षणसभापती

शालेय पोषण आहार दिला जातो कागदावरच
शालेयपोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार या शाळेत विद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या डब्यात किंवा कागदवरच दिल्या जात असल्याची माहिती आहे. शासनाने खिचडी वाटपासाठी शाळेला ताटे उपलब्ध करून दिली आहेत. परंतु त्या ताटांचा वापर होत नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकारावरून शालेय पोषण आहार जसा कागदावर दिल्या जातो, तसेच ताटही कागदोपत्रीच उपलब्ध करून दिले की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
खामगाव येथील नगरपालिकेच्या राजीव गांधी शाळा क्रमांक तीनमध्ये साफसफाई करताना विद्यार्थी.
बातम्या आणखी आहेत...