आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृह बनले त्यांच्यासाठी छळछावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अादिवासी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेता यावी यासाठी वसतिगृहे निर्माण करण्यात अाली अाहेत. मात्र, ही वसतिगृहे अाता विद्यार्थ्यांसाठी छळछावणी बनले अाहेत. विद्यार्थ्यांना या वसतिगृहांत प्यायला शुद्ध पाणी नाही तसेच जेवणाचीही अाबाळ हाेत अाहे. थंडीचा जाेर वाढत असतानाही अंगावर ब्लँकेट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कुडकुडत रात्र काढावी लागत अाहे. याबाबत विद्यार्थ्यांनी सहायक प्रकल्प अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या अाहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत टिळक मार्गावरील गणपतीनगरात आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात शंभरपेक्षाही जास्त विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यामध्ये इयत्ता ११ वीपासून तर एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वसतिगृहात जुलै महिन्यापासून विद्यार्थी राहत अाहे. सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनही अनेक विद्यार्थ्यांना ओळखपत्रसुद्धा देण्यात आले नाही. अभ्यासासाठी पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. वर्तमानपत्र नियमित येत नाही, वाचनासाठी स्वतंत्र सुविधा नाही, गृहपाल वसतिगृहात हजर राहत नाही, वसतिगृहात स्वच्छतेचा अभाव, अभ्यासासाठी टेबल खुर्ची नाही तर पांघरायला ब्लँकेट तर सोडा पण साधी चादरसुद्धा उपलब्ध करून देण्यात गृहपालाकडून दिरंगाई करण्यात आली आहे. या सर्व समस्यांनी विद्यार्थी त्रासून गेले असून, नेहमीच्या कटकटीमुळे त्यांची अभ्यासावरील एकाग्रता उडाली अाहे.

गृहपालाकडून बाहेरील व्यक्तींना प्रवेश : गृहपालहे आपल्या काही मित्रांना मद्य प्राशनाकरिता आणतात. खास करून चेतन लोखंडे नावाचा व्यक्ती नेहमीच त्यांच्यासोबत असतो. तोसुद्धा विद्यार्थ्यांना धमकावतो. त्याच्या येण्यामुळे आम्हाला त्रास होतो, अशी तक्रार अनेकदा केल्यानंतरही गृहपालाने त्याच्या येण्यावर प्रतिबंध घालता उलट विद्यार्थ्यांवरच राग काढण्यास सुरुवात केली आहे.

प्रकल्प अधिकाऱ्या कडूनही आश्वासनच : सहायकप्रकल्प अधिकारी यांची डिसेंबर रोजी उमेश चव्हाण, अविनाश मानटुटे, विष्णू डवले, दीपक मेघा, संताेष सरकुंभे, शिवदत्त सलाम, केशव म्हस्के या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. त्यांनी येत्या चार दिवसांत समस्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, अाज पाचवा दिवस उलटला तरी कारवाई केली नाही. अधिवेशन संपल्यानंतर गृहपालाची सफाई कामगाराची बदली करण्यात येईल, तसेच चेतन लोखंडे ह्या बाहेरील व्यक्तीचा वसतिगृहातील प्रवेश बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

अादिवासी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात भरारी घेता यावी यासाठी वसतिगृहे निर्माण करण्यात अाली अाहेत. मात्र, ही वसतिगृहे अाता विद्यार्थ्यांसाठी छळछावणी बनले अाहेत. विद्यार्थ्यांना या वसतिगृहांत प्यायला शुद्ध पाणी नाही तसेच जेवणाचीही अाबाळ हाेत अाहे. थंडीचा जाेर वाढत असतानाही अंगावर ब्लँकेट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कुडकुडत रात्र काढावी लागत अाहे. याबाबत विद्यार्थ्यांनी सहायक प्रकल्प अधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या अाहे.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत टिळक मार्गावरील गणपतीनगरात आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात शंभरपेक्षाही जास्त विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यामध्ये इयत्ता ११ वीपासून तर एमबीबीएसपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वसतिगृहात जुलै महिन्यापासून विद्यार्थी राहत अाहे. सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अजूनही अनेक विद्यार्थ्यांना ओळखपत्रसुद्धा देण्यात आले नाही. अभ्यासासाठी पुस्तकेही उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. वर्तमानपत्र नियमित येत नाही, वाचनासाठी स्वतंत्र सुविधा नाही, गृहपाल वसतिगृहात हजर राहत नाही, वसतिगृहात स्वच्छतेचा अभाव, अभ्यासासाठी टेबल खुर्ची नाही तर पांघरायला ब्लँकेट तर सोडा पण साधी चादरसुद्धा उपलब्ध करून देण्यात गृहपालाकडून दिरंगाई करण्यात आली आहे. या सर्व समस्यांनी विद्यार्थी त्रासून गेले असून, नेहमीच्या कटकटीमुळे त्यांची अभ्यासावरील एकाग्रता उडाली अाहे.

गृहपालाकडून बाहेरील व्यक्तींना प्रवेश : गृहपालहे आपल्या काही मित्रांना मद्य प्राशनाकरिता आणतात. खास करून चेतन लोखंडे नावाचा व्यक्ती नेहमीच त्यांच्यासोबत असतो. तोसुद्धा िवद्यार्थ्यांना धमकावतो. त्याच्या येण्यामुळे आम्हाला त्रास होतो, अशी तक्रार अनेकदा केल्यानंतरही गृहपालाने त्याच्या येण्यावर प्रतिबंध घालता उलट विद्यार्थ्यांवरच राग काढण्यास सुरुवात केली आहे.

प्रकल्प अधिकाऱ्या कडूनही आश्वासनच : सहायकप्रकल्प अधिकारी यांची डिसेंबर रोजी उमेश चव्हाण, अविनाश मानटुटे, विष्णू डवले, दीपक मेघा, संताेष सरकुंभे, शिवदत्त सलाम, केशव म्हस्के या विद्यार्थ्यांनी भेट घेतली. त्यांनी येत्या चार दिवसांत समस्या निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, अाज पाचवा दिवस उलटला तरी कारवाई केली नाही. अधिवेशन संपल्यानंतर गृहपालाची सफाई कामगाराची बदली करण्यात येईल, तसेच चेतन लोखंडे ह्या बाहेरील व्यक्तीचा वसतिगृहातील प्रवेश बंद करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.

वीज असूनही अंधारात स्वयंपाक
वसतीगृहातविज पुरवठा असतांनाही फक्त लाईट बंद असल्याने महिलांना अंधारातच स्वयंपाक बनवावा लागत आहे. याशिवाय गॅलरी, पायऱ्या, शौचालय याठिकाणचे लाईट सुध्दा बंद पडले आहेत. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य आहे. रात्रीबेरात्री बाहेर निघण्यास भिती वाटत असल्याची प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी दिली.

1. अाम्हालापिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे.
2.विद्यार्थ्यांसाठीदोन वेळचे चांगले जेवण उपलब्ध व्हावे.
3.पांघरायलाचादर, तर अंथरायला बेडशिट
4.वाचनासाठीटेबल, स्टँडची व्यवस्था करण्यात यावी.
5.अाम्हालानिर्वाह भत्ता वेळेवर मिळावा.
6.बाहेरीलव्यक्तींना वसतिगृहामध्ये प्रवेशबंदी असावी.

गृहपाल ऐकत नाही?
गृहपालाकडे विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यावर मला काही घेणे-देणे नाही, अशी भूमिका त्यांची असते. अडचणीवर उपाय काढणे सोडून त्यांचे उत्तर हे वरिष्ठांकडे माझी तक्रार करा, असे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांपुढे समस्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...