आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याची शैक्षणिक वाट होणार प्रकाशमय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - गणेशाेत्सवात सजावटीसह अन्य अनावश्यक खर्चाला फाटा देत जमा झालेल्या वर्गणीतून अादिवासी बहुल भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत डिजिटल क्लास रुम उभारण्याचा संकल्प युवाराष्ट्र परिवाराने केला आहे.

युवाराष्ट्र परिवाराच्या या सामाजिक दातृत्वाच्या विधायक उपक्रमातून पाेपटखेड (ता. आकोट) परिसरातील जनुना येथील शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाट प्रकाशमय हाेणार अाहे. शैक्षणिक विषमता दूर करण्याच्यासाठीच्या या कार्यात समाजातील विविध घटकांकडून स्वच्छेने वर्गणी गाेळा करण्यात येत अाहे. जवळपास दीड लाख रुपये खर्च करुन डिजिटल
क्लासरुम उभारण्यात येणार अाहे. बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाचे साेमवारी अागमन हाेणार अाहे. यासाठी अनेक मंडळांनी तयारी केली अाहे. मूर्ती, सजावट, लायटींग, वाजंत्री, मिरवणूक यावर लाखाे रुपयांचा खर्च उत्सवाच्या काळात हाेणार अाहे. मात्र प्रबाेधन प्रत्यक्ष कृतीने सामजिक परिर्वतनाचा झेंडा फडकाविणाऱ्या “युवाराष्ट्र” परिवार या संघटनेने यदाचा गणेशाेत्सव खास पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशाेत्सवासाठी गाेळा झालेल्या वर्गणीतून जास्तीत-जास्त बचत करावी बचतीतून जनुना येथील “आदीवासी” कोरकू बाल गणनायकांसाठी “डिजिटल क्लासरूम” ची उभारणी करण्याचा संकल्प ‘युवाराष्ट्र’ने केला. निरागस बालकांच्या स्वप्नांना पंख देण्याच्या कार्याला गणेशाेत्सवात प्रारंभ हाेणार अाहे.

साेशल मिडीयातून सामािजक परिवर्तन : गणेशाेत्सवातून बचत झालेल्या पैशातून अादीवासी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लास रुम उभारण्याचा संकल्प युवाराष्ट्रने केला. यासाठी व्हॅट्सअॅप गृप तयार करण्यात अाला. समाजाला काही तरी देणं लागतं, अशी भावाना असलेल्या सदस्यांनी १०० ते १००० रूपये देणगी देण्यास प्रारंभ केला. या कार्यात अातापर्यंत ७० पेक्षा जास्त समाजाप्रती संवेदनशील असलेल्या व्यक्तिंनी सहभाग नाेंदवला अाहे. समाजातील शेवटच्या घटकाला मुख्य प्रवाहात अाणण्याच्या या कार्यात समाजातील प्रत्येकाने खारीचा वाटा उचलावा, यासाठी युवाराष्ट्रकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे डॉ.निलेश पाटील,अविनाश नाकट पाटील, धनंजय मिश्रा, विलास ताथोड यांनी कळविले अाहे.

पर्यावरणाचेही हानी टळेल : गणेशाेत्सवाच्या काळात पर्यावरणाची हानी हाेत असल्याचा अाराेप पर्यावरणवाद्यांकडून हाेताे. शाडूच्या मातीच्या गणेश मूिर्तची स्थापना करणे, डिजेचा वापर टाळणे, अनावश्यक विद्युतचा वापर करु नये, यासाठी प्रशासन सामािजक संघटनांकडून अावाहन करण्यात येते. युवाराष्ट्राकडून साजरा हाेणाऱ्या गणेशाेत्सवात या गाेष्टी टाळल्या जातील, असा दावा युवाराष्ट्राकडून करण्यात येत अाहे.

युवा राष्ट्रचे असेही कार्य
युवाराष्ट्राने अातापर्यंत २०० पेक्षा शेतकरी कुटुंबीयांना स्वयंराेजगारासाठी मदत केली. २९ गरजू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत केली. पातूर तालुक्यातील तांदळी येथे १५ फेब्रुवारी २०१६ राेजी डिजिटल क्लास रुमचे लाेकार्पण केले. याशिवाय राष्ट्रयुवातर्फे वर्षभर जलसिंचन, पर्यावरण रक्षण, वृक्षाराेपणसाठी वर्षभर उपक्रम राबवण्यात येतात.
अशी डिजिटल क्लास रुम
आदिवासीभागातील मुलांसाठी डिजिटल क्लासरूम उभारण्याचे कार्य गणेशेात्सवात पूर्ण हाेणार अाहे. १६७ विद्यार्थी असलेल्या या शाळेत चार वर्ग खाेल्या असून शिक्षक अाहेत. या रुममध्ये संगणक, प्राेजेक्टर, स्क्रिन, ते ७वीचे साॅफ्टवेअर, हाेम थिएटर, मॅटीन, फॅनची व्यवस्था करण्यात येणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...