आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी संघटना पुन्हा छेडणार तीव्र आंदोलन, शिक्षणाधिकारी अाणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकरावीच्या केंद्रीय प्रवेशासाठी आता एनएसयूआय अभाविपने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. काहीही झाले तरी चालेल मात्र, ही प्रक्रिया चालू सत्रापासूनच लागू केली पाहिजे, अशी एनएसयूआयची भूमिका आहे. प्रसंगी त्यासाठी रस्त्यावर उतरून कायदा हातात घेण्याचीही आमची तयारी आहे, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
अकरावीचे प्रवेश परंपरागत पद्धतीने होत असल्यामुळे सामान्य पालकांची फरपट होत असून, गुणवत्ता असतानाही केवळ आर्थिक बळ नसल्यामुळे त्यांच्या पाल्यांना नामांकित महाविद्यालयातील प्रवेशांना मुकावे लागत आहे. केंद्रीय प्रवेश पद्धतीत अशी फसगत होत नाही. त्यामुळे एनएसयूआय, अभाविप, मनसे आदी विद्यार्थी संघटनांनी या वर्षीच्या प्रारंभीपासूनच केंद्रीय प्रवेशाची मागणी लावून धरली. हा विषय सर्वसामान्य विद्यार्थी-पालकांच्या हिताचा पारदर्शक असल्यामुळे ‘दिव्य मराठी’नेही लावून धरला. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांना मुख्याध्यापक प्राचार्यांची बैठक बोलावणे भाग पडले. मात्र, या बैठकीत पुढच्या सत्रापासून तीही केवळ अकोला शहर आणि विज्ञान विषयापुरती ही पद्धत लागू केली जाईल, अशी थातूरमातूर उपाययोजना करण्याचे घोषित केले गेले. शिक्षणाधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर विद्यार्थी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते शिक्षणाधिकाऱ्यांची ही खेळी शिकवणी वर्गाचे संचालक नामांकित संस्थाचालकांमध्ये सुरू असलेल्या अलिखित अर्थपूर्ण व्यवहाराला बिनबोभाट सुरू ठेवण्याचे षडयंत्र आहे. ते भेदून काढण्यासाठी आता जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे. विशेष असे की, हीच भूमिका विदर्भ संवैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य तथा नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी व्यक्त केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना थेट आदेश देऊन ही पद्धत लागू करण्याचा अधिकार वापरावा, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

संघटनांचा अाराेप
क्रेंद्रिय पध्दतीने प्रवेश हाेऊ देणे शिक्षणाधिकाऱ्यांची ही खेळी शिकवणी वर्गाचे संचालक नामांकित संस्थाचालकांमध्ये सुरू असलेल्या अलिखित अर्थपूर्ण व्यवहाराला बिनबोभाट सुरू ठेवण्याचे षडयंत्र आहे. असा अाराेपही विद्यार्थी संघटनांनी केला अाहे.

शिक्षण विभागाची पळपुटी भूमिका
^केंद्रीय प्रवेशप्रक्रिया ही सर्वसामान्यांच्या हिताची पारदर्शक आहे. शिवाय नजीकच्या अमरावती नागपूर जिल्ह्यात ती राबवली जात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन येथे अंमल केला जाऊ शकतो. शिक्षण विभाग पळपुटी भूमिका घेत असून, संस्थाचालक शिकवणीवर्गांचे संचालक यांमधील साखळीलाि बळ देत आहेत. त्यासाठी क्रेंद्रीय प्रवेश हवे.'' प्रा.डॉ. राजीव बोरकर, प्रांत पदाधिकारी, अभाविप. अकोला.

...तर रस्त्यावर उतरून कायदा हातात घेऊ
^केंद्रीय प्रवेशपद्धती ही पारदर्शक िवद्यार्थी-पालकांची लूट थांबवणारी आहे. ती त्वरित लागू करणे शक्य नाही, हे म्हणणे सर्वथा गैर आहे. ऑनलाइन शक्य नसेल तर प्रशासनाने हस्तक्षेप करून ती ऑफलाइन राबवावी. एनएसयूआय यासाठी कटिबद्ध असून, प्रसंगी रस्त्यावर उतरून कायदा हातात घेण्यासही आम्ही मागेपुढे पाहणार नाही.प्रशासनाने सर्वसामान्यांचा अंत पाहू नये.'' आकाशकवडे, िजल्हाध्यक्ष, एनएसयूआय, अकोला.
बातम्या आणखी आहेत...