आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिकवणीवरूनघरी जात असताना विद्यार्थिनीचा केला विनयभंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- शिकवणीवरूनघरी जात असताना २४ वर्षीय युवतीचा विनयभंग झाल्याची घटना बुधवारी सहकारनगरमध्ये घडली. याप्रकरणी वणीरंभापूर येथील युवकाविरुद्ध खदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनी शिकवणीवरून तिच्या मावसभावासोबत घरी जात होती. या वेळी २६ वर्षांचा युवक तिच्यामागे दुचाकीवरून आला. त्याने या मुलीचा मोबाइलमध्ये फोटो काढला आणि तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला. या वेळी तिच्या मावसभावाला जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. गुरुवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.