आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्याच्या मारहाणीत वर्गमित्राचा मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - पेपर पाहण्यासाठी मनाई केल्याचा राग अनावर झाल्याने एका विद्यार्थ्याने केलेल्या बेदम मारहाणीमुळे शुभम रमेश ढगे या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी अकोट येथील बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालयात घडली. या घटनेनंतर विविध अफवा पसरल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, काही काळासाठी बाजारपेठही बंद करण्यात आली होती, तर पालकांनी आपल्या पाल्यांना शाळांमधून घरी नेण्यासाठी गर्दी केल्याने सर्वत्र गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
शुभम ढगे त्याचा १७ वर्षीय एक वर्गमित्र हे दोघेही बाबू जगजीवनराम कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ११ वीमध्ये आहेत. प्रथम सत्र परीक्षेच्या उत्तरपत्रिका आज वर्गात दाखवण्यात आल्या. त्यानंतर संबंधित प्राध्यापिकेने उत्तरपत्रिकेचा गठ्ठा शुभमजवळ दिला प्राचार्य देवेंद्र जपसरे यांच्याकडे देण्यास सांगितले. शुभम हा गठ्ठा घेऊन जात असताना त्याच्या वर्गमित्राने त्याला अडवले उत्तरपत्रिका मागितली. मात्र, शुभमने त्यास नकार दिल्यावर त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत शुभम कोसळला. त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

सदोष मनुष्य वधाचा गुन्हा नोंदवण्याची पित्याची मागणी : शुभमचामृतदेह शाळेतच पडून होता. प्राचार्य शिक्षकांनी त्याला रुग्णालयात घेऊन जाण्याचेही सौजन्य दाखवले नाही, असा आरोप करत शुभमच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या त्या मुलासह त्याचे साथीदार, प्राचार्य संबंधित शिक्षकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी शुभमच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत केली आहे.

मृतदेह रुग्णालयात पडून : प्राचार्यजपसरे, अन्य शिक्षक मुख्य आरोपी यास अटक केल्याशिवाय शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने शुभमचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पडून होता. पोलिस अधिकारी जमावाची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान, सायंकाळी ७.३० वाजता शुभमच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यात्रेतपळापळ, संचारबंदीची अफवा :या घटनेनंतर उफवांमुळे संत नरसिंग महाराजांच्या यात्रेतील दुकाने बंद झाली होती. ग्राहकांचीही पळापळ झाली, तर दुसरीकडे शहरामध्ये संचारबंदीची अफवा पसरल्यानेही तणावाची स्थिती निर्माण झाली होती. बंदोबस्तासाठी अकोटसह अकोला, हिवरखेड, तेल्हारा मुख्यालयाचे पोलिस तैनात करण्यात आले होते.

पोलिसांचे पथ संचलन :जादा पोलिस कुमक आल्यानंतर ठाणेदार नागरे यांच्या नेतृत्वात गावामध्ये पथसंचलन करण्यात आले. दुकानदारांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. त्यामुळे तणाव निवळण्यास मदत झाली.

अल्पवयीन आरोपी ताब्यात : याप्रकरणातील मुख्य अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे. मृतक शुभमचे वडील रमेश ढगे, आई विद्या ढगे आणि त्याच्या तीन आत्या दोन लहान बहिणींनी ग्रामीण रुग्णालयात आक्रोश केल्याने वातावरण शोकाकुल झाले होते.

पोलिसांवर दगडफेक, कर्मचारी झाले जखमी
घटनेनंतर अफवा पसरल्याने तणावाची स्थिती झाली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, जमावाने पोलिसांच्या वाहनांसोबतच पोलिसांवर दगडफेक केली. यामध्ये काही कर्मचारी एक पोलिस उपनिरीक्षक किरकोळ जखमी झाले. त्यानंतर जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिस निरीक्षक कैलास नागरे उपनिरीक्षक अण्णाराव खोडेवाड यांच्या नेतृत्वात शहर पोलिसांनी चांगलीच धावपळ करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र मनवरे, ठाणेदार नागरे यांनी स्वत: फिरून दुकानदारांना दिलासा देत बाजारपेठ पूर्ववत सुरू केली.


बातम्या आणखी आहेत...