आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेत पटकावले पाच सुवर्ण, दोन रजत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन इंडिया स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन, पाँडिचेरीच्या वतीने २४ ते २७ जुलैदरम्यान एसएलएम तिरुमना महल, कराईकल येथे झालेल्या दुसऱ्या स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेत अकोल्याच्या कराटेपटूंनी यश मिळवल्याबद्दल त्यांचा ३१ जुलैला सत्कार करण्यात आला.
या स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेत कराटे, तायक्वांदो, जितकांडो, किक बॉक्सिंग, वुशू, कुंफू जोमसार या खेळांचा समावेश होता. या राष्ट्रीय स्पर्धेत अकोल्यातील स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनच्या कराटेपटूंनी सचिव तथा प्रशिक्षक मनोज अंबेरे यांच्या मार्गदर्शनात सहभाग नोंदवला होता. खेळाडूंनी स्पर्धेत चांगली कामगिरी बजावत सुवर्ण, रजत कांस्यपदकांची कमाई केली. यामध्ये सुमीत गिरी, साहिल गोखले, मयूर भोंडाणे, प्रेम आमकर, शुभम राठोड यांनी सुवर्णपदक पटकावले. ईशान पाटीलने रजत अक्षय दोड कांस्यपदकाचा मानकरी ठरला. मुलींमध्ये दीपाली मेश्रामने रजत पल्लवी अंबोरेने कांस्यपदक पटकावले. तसेच श्रीलंका येथे होणाऱ्या स्टुडंट ऑलिम्पिक साऊथ एशिया गेम्सकरिता या खेळाडूंची निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन अकोलाचे अध्यक्ष अॅड. पप्पू मोरवाल, सचिव मनोज अंबेरे, सुरेशसिंह मलिये, शेख अहमद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळ्यास अॅड. गजानन भोपळे, अॅड. गणेश परिहार, अॅड. राजेश खत्री, अॅड. राकेश पाली, अमित जोगपुत्र, सुनील मोरवाल, पिंटू दळवी, राही अढाऊ, संजय सूर्यवंशी, अॅड. दीप्ती पोरानी, अॅड. सीमा पागड, अॅड. वर्षा खंडेलवाल, चित्रा रुडकर आदींची उपस्थिती होती. श्रीलंका येथे होणाऱ्या स्टुडंट ऑलिम्पिक साऊथ एशिया गेम्सकरिता खेळाडूंना करण चिमा, कैलास खेते, गणेश कळसकर, महेंद्र गवई, सागर भावसार, आशू वानखडे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत

यांनी मिळवली पदके
सुमीत गिरी, साहिल गोखले, मयूर भोंडाणे, प्रेम आमकर, शुभम राठोड यांनी सुवर्णपदक. ईशान पाटीलने रजत अक्षय दोड कांस्यपदकाचा मानकरी ठरला. मुलींमध्ये दीपाली मेश्रामने रजत पल्लवी अंबोरेने कांस्यपदक पटकावले आहे.

आता श्रीलंकावारी
कराईकलयेथे झालेल्या दुसऱ्या स्टुडंट ऑलिम्पिक स्पर्धेत अकोल्याच्या कराटेपटूंनी घवघवीत यश मिळवून पदके पटकावली आहेत. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची श्रीलंका येथे होणाऱ्या स्टुडंट ऑलिम्पिक साऊथ एशिया गेम्सकरितासुद्धा निवड झाली आहे. या निवडीमुळे अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.