आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापिकेच्या बदलीसाठी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रास्ता रोको आंदोलन करताना सामदा येथील शासकीय निवासी शाळेचे विद्यार्थीसह नागरिक - Divya Marathi
रास्ता रोको आंदोलन करताना सामदा येथील शासकीय निवासी शाळेचे विद्यार्थीसह नागरिक
(रास्ता रोको आंदोलन करताना सामदा येथील शासकीय निवासी शाळेचे विद्यार्थीसह नागरिक.)
दर्यापूर- अपमानास्पदवागणुकीला कंटाळून सामदानजीक असलेल्या शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापिकेची बदली करण्याच्या मागणीसाठी शंभरच्या वर विद्यार्थ्यांनी दर्यापूर-दहिहांडा मार्गावर बुधवारी (दि. ८) सकाळी रास्ता रोको आंदोलन करून वाहतूक रोखून धरली.

तालुक्यातील सामदा गावानजीक सामाजिक न्याय विभागाची शासकीय निवासी शाळा आहे. या शाळेवर मागील अडीच वर्षांपासून मुख्याध्यापिका शीला मोहोड कार्यरत आहेत. मोहोड यांच्या अपमानास्पद वागणुकीला येथील विद्यार्थी अनेक दिवसांपासून कंटाळले आहेत. दरम्यान, मोहोड यांच्या वागणुकीला कंटाळून त्यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी आज अंदाजे शंभरच्या वर विद्यार्थी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दर्यापूर-दहिहांडा मार्गावर उतरले. विद्यार्थ्यांनी तब्बल तीन तास मार्गावरील वाहतूक रोखून धरली. घटनेची माहिती मिळताच सहायक उपायुक्त प्रभारी प्रादेशिक उपायुक्त दत्तात्रय
विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न
जेवणासाठीताट कमी पडल्याने विद्यार्थी संतप्त होऊन गोंधळ घातला. काही विद्यार्थी राजकीय मंडळी पालकांच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे बेजबाबदारपणे वागत आहेत. विद्यार्थ्यांना चांगली शिस्त लावण्याचा प्रयत्न असून, नियमाप्रमाणे विद्यार्थ्यांची देखभाल केली जाते. शीलामोहोड, मुख्याध्यापिका.

अहवाल पाठवला
मुख्याध्यापिकामोहोड यांच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची चौकशी केली असता त्यात तथ्य आढळून आलेे.त्यासंबंधीचा अहवाल प्रादेशिक आयुक्तांकडे पाठवला आहे. दत्तात्रयिफस्के, सहा. उपायुक्त सामाजिक न्याय विभाग