आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता शुभमची आत्महत्या, भावाला शिकवण्याची विनंती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या शुभम भांगेचा मृतदेह आज सकाळी खदानीत आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. शुभमने आईची माफी मागून भावाला शिकवण्याची िवनंती केली आहे. मृत्यूपूर्व त्याने लिहिलेल्या चिठ्ठीवरून त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मलकापूर येथील शुभम भांगे (वय १९) हा २४ नोव्हेंबरच्या रात्रीपासून घरातून निघून गेला होता. कुटुंबातील व्यक्तींनी त्याचा खूप शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी खदान पोलिसात तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास करीत असताना खदान पोलिसांना शुभमच्या घरात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात आत्महत्या करीत असल्याचे त्याने लिहून ठेवले होते. अभ्यास केल्याची कबुली त्याने देऊन दुसऱ्या भावाला शिकवून मोठे कर, असे म्हणून आईची माफी मागितल्याचा उल्लेख केला होता. ही चिठ्ठी सापडल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून पोलिस त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला. मात्र, तो आढळून आला नाही.

आज आढळला मृतदेह
मलकापूरते येवता मार्गावर कोठारी खदान असून, शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला. पोलिसांनी तत्काळ त्याच्या कुटुंबीयांना बोलावून प्रेताची ओळख पटवली. त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार सी. टी. इंगळे करीत आहेत.