आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच वर्षांत ९०३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिल्ह्यातील ४१८ जणांच्‍या कुटुंबीयाना लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - नापिकी कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यातील िवविध गावांमध्ये ९०३ शेतकऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत आत्महत्या केल्या आहेत. यांपैकी जिल्हास्तरीय समितीने ४१८ पात्र, तर ४९२ आत्महत्या अपात्र ठरवल्या आहेत. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह मदतीची रक्कम देण्यात आली आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून जिल्ह्यात पर्यावरणाचा समतोल ढासळलेला िदसून येतो. याचा परिणाम पीक परिस्थितीवर झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येते. आधीच कमी उत्पादन त्यात कौटुंबिक जबाबदा ऱ्या पार पाडताना शेतकरी हवालदिल झालेला िदसून येतो. आर्थिक विवंचनेतील अशा अनेक शेतकऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग पत्करलेला दिसून येतो. सततची नापिकी, कर्जबाजारीपणामुळे या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद शासन दरबारी आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दु:खातून सावरण्यासाठी तसेच आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी तत्काळ तहसीलदारांचे पथक संबंधित शेतकऱ्याच्या घरी भेट देते. आत्महत्येचा पंचनामा केल्यानंतर तत्काळ सानुग्रह मदतीसाठी प्रस्ताव तयार केला जातो. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकरी आत्महत्या निवारण समितीच्या बैठकीत महिन्यातील प्रस्तावावर चर्चा होऊन प्रकरणे निकाली काढल्या जातात.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून जाणून घ्‍या, गंभीर आकडेवारी..