आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीमध्ये उडी घेवून पती पत्नीची आत्महत्या; घरगुती वादातून प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोताळा - गावाशेजारी असलेल्या सरकारी गावठाणमधील एका विहिरीत उडी घेवून पती-पत्नीने आत्महत्या केली आहे. ही घटना तालुक्यातील सहस्त्रमुळी येथे मंगळवार, दि. 5 सप्टेंबरच्या रात्री आठ वाजता घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून पती- पत्नीने आत्महत्या केल्याची चर्चा गावात होत आहे. 
 
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या सहस्त्र मुळी येथील धनगर वाड्यावर मंगेश अशोक सावळे (वय २६) प्रियंका मंबेश सावळे (वय २२) हे पती पत्नी राहात होते. चार वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. परंतु त्यांना मुलबाळ झाले नव्हते. दरम्यान काल सप्टेंबर रोजी गावात गणेश विसर्जनाची तयारी सुरू होती. विसर्जन कामासाठी मंगेशने सुद्धा मदत केली. त्यानंतर तो घरी निघून गेला. विसर्जन मिरवणुक सुरू झाल्यामुळे सर्व गाव मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्याचवेळी पती-पत्नीमध्ये नेमके काय घडले, हे कुणालाच समजले नाही. रात्रीचे सुमारास ते दोघेही गावा शेजारील विहिरीकडे गेल्याचे काही ग्रामस्थांना दिसले. विहिरीजवळ पोहोचल्यानंतर दोघानींही विहिरीत उड्या मारल्या. विहिरीत दहा ते पंधरा फूट पाणी असल्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. 

परंतु दोघांचेही मृतदेह विहिरीच्या कपारीत गेल्यामुळे ते पाण्यावर आले नाही. त्यानंतर या घटनेची माहिती बोराखेडी पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, बुधवारी सप्टेंबर रोजी सकाळी ठाणेदार अविनाश भामरे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघाचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून ते बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. प्रकरणी मनोहर सावळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बोर्डे हे करीत आहेत. एकाच वेळी पती पत्नीने आत्म्हत्या का केली, याचे कारण समजू शकले नाही. मृतक मंगेशची आई मोताळा येथे राहात असून, लहान भाऊ शिक्षणासाठी बाहेरगावी आहे. तर पाच सहा वर्षांपूर्वी त्याच्या वडीलांनीसुद्धा आत्महत्या केली होती, असे सांगण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...