आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्‍मदहनाचा इशारा देणारा फरार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- जागेचा वाद उपस्थित करून आपणास आणि आपल्या कुटुंबीयांना मारहाण केल्या जात आहे. तशी तक्रार एका नागरिकाने पोलिसात दिली होती. मात्र, दोषींवर कारवाई होत नसल्यामुळे व्यवस्थेला कंटाळून त्यांनी २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्यानुसार शनिवारी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तगडा बंदोबस्त ठेवला होता.
मोठी उमरी येथील वासुदेव बाबन शित्रे यांच्यासोबत शेजारी वाद घालून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना त्रास देत आहेत. सुरुवातीला घटनेची तक्रार शित्रे यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, पोलिसांनी गैर अर्जदारांवर कोणतीही कारवाई केली नाही.
त्यानंतरही शित्रे आणि त्यांच्या मुलांना मारहाण करण्यात आली होती.आपणास न्याय मिळत नाही, म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी केली होती. आपणास जर न्याय मिळाला नाही, तर आपण २५ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आत्मदहन करू, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला होता. मात्र, यादरम्यान सिटी कोतवाली पोलिस अाणि सिव्हिल लाइन्स पोलिसांनी त्यांना समजावून आत्मदहन करण्याच्या प्रयत्नांपासून परावृत्त केले होते. मात्र, खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयावर पाळत ठेवली. या वेळी अग्निशमन दलाचे बंबसुद्धा दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात ठेवण्यात आले होते.

शनिवारी अग्निशमन दलाची गाडी, अॅम्ब्युलन्स दिवसभर परिसरात उभीच होती.
आत्मदहन करणारा आलाच नाही, अधिकाऱ्यांची धावपळ