आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींना ‘सुकन्या समृद्धी’चा आधार, शिक्षण विवाहासाठी टपाल खात्याची स्मार्ट योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - टपाल खात्याची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असलेल्या सुकन्या समृद्धी अकाउंटने (एसएसए) शहरातील हजारो लहान मुलींचे भवितव्य सावरले आहे. प्राप्तीकरातून सुट मिळवून देणाऱ्या या योजनेमुळे चाकरमान्यांनाही चांगलीच मदत झाली असून आतापर्यंत १२ हजार ९६७ पालकांनी त्यांच्या दोन मुलींची खाती उघडली आहेत.
मुलींचे शिक्षण विवाह या दोन प्रसंगी हमखास मदत पुरवणारी ही योजना आहे. त्यामुळे तिला चांगला प्रतिसाद मिळत असून महिला सक्षमीकरणाचा राष्ट्रीय उद्देशही यशस्वी झाल्याचे टपाल खात्याचे निरीक्षण आहे. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंतच्या दोन मुलींच्या नावे हे खाते उघडता येते. मुलींचे वय कमी असल्यामुळे अर्थातच ही खाती पालकांना उघडायची असून त्यांनाच ती हाताळायचीही आहे.

या खात्यात वर्षातून किमान हजार रुपये जमा करावयाचे असून वर्षभरात जास्तीत जास्त दीड लाखापर्यंतची रक्कम जमा करण्याची मुभा आहे. या रकमेवर आकर्षक व्याजही टपाल खात्यातर्फे दिले जाते. हे खाते मुलीच्या वयाच्या २१ व्या वर्षी आपोआप बंद होते. त्यामुळे तोपर्यंतच्या काळात जमा झालेली रक्कम शिक्षण आणि विवाहासाठी वापरता येते. खाते उघडल्यापासून १४ वर्षापर्यंत या खात्यात रक्कम जमा करता येते. दरम्यान मुलीचे वय १८ वर्षे झाल्यानंतर िशक्षणासाठी ५० टक्के रक्कम काढण्याची मुभा असून उर्वरित रक्कम २१ व्या वर्षानंतर काढता येते. मुलीचा विवाह अठराव्या वर्षीच जुळल्यास खाते मुदतपूर्व बंद करण्याचीही सोय उपलब्ध आहे. विवाहाच्या किमान महिनाभरापूर्वी तसे कळवले जावे, असे टपाल खात्याचे म्हणणे आहे.

...तरदोन पेक्षा जास्त खात्याची सोय : एखाद्याकुटुंबात पहिल्या मुलीचे खाते उघडल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या जन्माच्या वेळी जुळ्या बहिणी जन्माला आल्या तर अशा कुटुंबाला दोनपेक्षा जास्त म्हणजे तीन खाती उघडण्याचीही मुभा आहे. मात्र अशा प्रकरणात सदर कुटुंबातील पालकांना त्या मुलींच्या जन्माचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले अधिकृत पुरावे सादर करावे लागतील, असे टपाल खात्याचे म्हणणे आहे.
योजनेला प्रतिसाद
^सुकन्या समृद्धी अकाउंट या योजनेला अकोलेकर पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुलींच्या एकूणच भवितव्याचा विचार करुन ही योजना तयार करण्यात आल्याने अनेकांनी तिचे स्वागत केले आहे.'' एन.पी. आरसे, प्रवर डाक अधीक्षक,
^सुकन्यासमृद्धीअकाउंट या योजनेला अकोलेकर पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुलींच्या एकूणच भवितव्याचा विचार करुन ही योजना तयार करण्यात आल्याने अनेकांनी तिचे स्वागत केले आहे.'' एन.पी. आरसे, प्रवर डाक अधीक्षक,
बातम्या आणखी आहेत...