आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळबागांना बसला सनस्ट्रोक, जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गेल्या शेती हंगामात विविध पिकांचे उत्पादन घटल्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. अशातच येणारा खरीप हंगाम समोर आहे. बागायतदार शेतकऱ्यांना अपेक्षा होती ती फळबागांच्या उत्पादनाची, मात्र मे हीटचा फळपिकांना चांगलाच फटका बसला आहे. वाढत्या तापमानामुळे केळी, पपई डाळिंब या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बागायतदारांचे पीक येण्याआधीच सनस्ट्राेकमुळे शेतकऱ्यांचे उन्हाळ्यात नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील सर्वाधिक शेती क्षेत्र कोरडवाहू, तर त्यानंतर बागायती आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भागात फळपिकाखाली मोठे क्षेत्र आहे. या भागात दिवसागणिक फळ पिकांची लागवड वाढती आहे. यामध्ये केळी संत्रा, डाळिंब, पपई, लिंबू आदी पिकांखालील क्षेत्र अधिक आहे. जिल्ह्यात बागायती शेतीत मुबलक पाण्याच्या भरवशावर शेतकरी फळबाग लागवड करत अधिक उत्पादनासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु, त्यांच्या परिश्रमाची दरवर्षीच कसोटी लागत आहे. शेतकऱ्यांसमोर विविध संकट आले असताना त्यांचा मुकाबला करताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शासनाच्या योजनेचा आधार घेत अनेक शेतकऱ्यांनी फळपिकाचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. परंतु, ऐन उमेदीच्या काळातच या पिकांवर बदलत्या वातावरणाचा परिणाम होत आहे. एप्रिल मेच्या वाढत्या तापमानाचा प्रहार फळ पिकांवर झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात केळी, पपई, डाळिंबाचे नुकसान झाले आहे. अशातच भूगर्भातील पाण्याची पातळी खोल गेली आहे. विहिरी कूपनलिका आटल्या आहेत. जेमतेम पाणी असल्यावरही विजेचा प्रश्न पिकांना पाणी देण्यात अडसर ठरत होता. त्यामुळे वाढत्या तापमानाचा अनिष्ट परिणाम पिकांवर झाला आहे. एप्रिलमध्ये केळीच्या पानांचा रंग बदलण्यास सुरुवात झाली होती. हिरवी पाने पिवळी पडून फाटत होती. तसेच काही भागातील केळीचे घळसुद्धा काळे डाग पडल्याने खाली गळून पडल्याचे शेतकरी सांगतात. यासोबतच डाळिंबावर वाढत्या तापमानाचा परिणाम होऊन ते सडून खाली पडत आहेत. काळे डाग पडल्याने डाळिंबाचा आकार वाढत नसून त्याचे वजन कमी भरते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पपईच्या बागा पाण्याच्या कमतरतेमुळे खल्लास झाल्या आहेत. अति उष्णतेमुळे पपईचेसुद्धा नुकसान झाले आहे. लिंबाच्या बागा पाण्याअभावी वाढत्या तापमानापुढे जळाल्याचे काही शेतात दिसून येते.

पाऊस अाल्यानंतर मिळेल दिलासा
^वाढत्या तापमानाचापरिणाम फळपिकांवर दरवर्षी होत आहे. येत्या मृग नक्षत्रात पावसाचा अंदाज आहे. पावसाचे आगमन लवकर झाल्यास फळबागांना वाढत्या तापमानापासून दिलासा मिळेल. त्यामुळे नुकसान टळू शकले.'' शांताराम मालपुरे, सहायकजिल्हा कृषी अधीक्षक, अकोला

तापमानाचा केळीवर सर्वाधिक परिणाम
^मे महिन्यातील वाढत्या तापमानाचा केळी पिकावर जास्त परिणाम झाला आहे. सुरुवातीला पिवळेपणा येऊन नंतर केळीची पाने करपली. एका एकरात साडेसतरा हजार झाडे बसतात. या वर्षी तापमानात वाढ, तर दुसरीकडे पाण्याची पातळी खोल गेल्याने केळी पिकावर परिणाम झाला आहे.'' अनंता इंगळे, केळीउत्पादक, चितलवाडी
बातम्या आणखी आहेत...