आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकाऱ्यांचे निवासस्थान एकत्र की अलग-अलग?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला-मूर्तिजापूर रस्त्यावरील नेहरू पार्क चौकात जिल्हा पोलिस अधीक्षकांचे सरकारी निवासस्थान आहे. ‘उदय’ हे या बंगल्याचे नाव. या बंगल्याला नेहरू पार्क ते रतनलाल प्लॉट रस्त्यावरूनही प्रवेश आहे. मात्र, मूर्तिजापूर रस्त्यावरील प्रवेश द्वारावर लावण्यात आलेला शीलालेख सध्या उखडलेला आहे, तर दुसऱ्या रस्त्यावरील बंगल्याच्या दिशासूचक पाटीवर ‘निवास’ आणि ‘स्थान’ हे शब्द वेगवेगळे लिहिले आहे. भाषेतील ही चूक एवढ्यावरच थांबली नाही, तर त्याच पाटीच्या मागच्या बाजूने स्टीलच्या कोरीव अक्षरांमध्ये निवासस्थान लिहिताना ‘स’चा विसर पडल्यामुळे भलताच शब्द तयार झाला आहे. याशिवाय व्याकरणातील इतरही काही चुका या पाटीवर प्रतिबिंबित झाल्या आहेत. याच रस्त्याने थोडे पुढे चालले की, जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन आहे. परंतु, लिहिणाऱ्याने यातील भवनशब्दात घोळ केला आहे. भवन लिहिता या ठिकाणी चक्क ‘भवण’, असे लिहिण्यात आले आहे. बहुधा ही पाटी जिल्हा परिषद कर्मचारी संघाने दुसऱ्यांकडून तयार करून घेतली. परंतु, ती लिहिली जात असताना लक्ष का ठेवले नसावे, असा काहींचा प्रश्न आहे. याउलट जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाची पाटी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करण्यात आली असून, ती लावण्यापूर्वी कुण्या अधिकारी-कर्मचाऱ्याने पडताळली नाही का, असा भाषाप्रेमींचा सवाल आहे.

शुद्धलेखन नव्हे प्रमाण लेखन : मराठीशुद्ध की अशुद्ध याबद्दलही बरेच दिवस वाद होता. एवढेच काय ‘शुद्धलेखन’ नावाने पुस्तके आणि ग्रंथही तयार झालेत. परंतु, ज्येष्ठ लेखक, समीक्षक आणि तत्त्वज्ञ डॉ. आ. ह. साळुंखे यांनी यातील मर्म स्पष्ट केले. भाषा ही मुळात शुद्ध किंवा अशुद्ध नसतेच. ती प्रमाणित अथवा अप्रमाणित असू शकते. त्यामुळे राज्याच्या विधिमंडळाने हा युक्तिवाद मान्य करून शुद्धलेखन हा शब्द मागे घेत त्याला ‘प्रमाणलेखन’ हे नाव दिले.

चुका टाळल्याच पाहिजे
^पोलिस अधीक्षकांसारख्या ज्येष्ठ अधिकाऱ्याच्या घराच्या पाटीवर चूक असणे हे अत्यंत चुकीचे आहे. ज्या कुण्या विभागाकडे बंगल्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी आहे, त्यांनी पाटी लावताना त्यावरील अक्षरे नीट आहेत की नाही, हे बघायला पाहिजे होते. मात्र, तसे झाले नाही. सरकारी कार्यालयांच्या पाटींवरील अक्षरे हे लोकसाक्षरतेचे माध्यम आहे. त्यामुळे ते तत्काळ दुरुस्त करायला पाहिजे. गजानन धनसांडे, भाषाप्रेमी,अकोला.

राज्यभर बदल
कार्यालये अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या पाट्या हा चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी समाजकल्याण विभागातर्फे शासकीय मागासवर्गीय मुलामुलींचे वसतिगृह, असा शब्दप्रयोग केला होता. त्यानंंतर शासकीय वसतिगृह असा शब्दप्रयोग बदलला.
बातम्या आणखी आहेत...