आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खामगाव नगराध्यक्षांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, माजी नगराध्यक्षांनाही अटक करण्याचे निर्देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - खामगाव नगरपालिका इमारत बांधकाम लेखापरीक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्यासह माजी नगराध्यक्षा सरस्वती खासणे यांना दिलासा दिला असून, त्यांना अटक करण्याचे आदेश शुक्रवार, १८ मार्च रोजी दिले आहे.
नगराध्यक्ष अशोक सानंदा, माजी नगराध्यक्षा सरस्वती खासणे, माजी नगरसेवक दिनेश अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण खारीज करण्यासाठी याचिका दाखल केली होती. आज न्यायाधीश केहर न्या. सी. नागाप्पन यांच्या खंडपीठीय न्यायालयात सुनावणी झाली असता, नगराध्यक्ष अशोक सानंदा, माजी नगराध्यक्षा सरस्वती खासणे, माजी नगरसेवक दिनेश अग्रवाल यांच्यासह इतरांना अटक करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे कॅव्हेट दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. कपिल सिब्बल, अॅड. बिना गुप्ता यांनी बाजू मांडली.
बातम्या आणखी आहेत...