आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीच्या परीक्षेतसुद्धा निकालाची भीती : खा. सुळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - इंग्रजीतून शिक्षण घेतल्यामुळे इंग्रजीतच बोलायचे. मराठीत बोलायचे झाल्यास आधी इंग्रजीतून मराठी ट्रान्सलेट करायचे, नंतर मराठी बोलायचे,आता मात्र परिस्थिती बदलली आहे. मराठीत विचार करते, त्याचे ट्रान्सलेट इंग्रजीत करते मग कोठे इंग्रजी बोलते. एवढी इंग्रजी कमी होऊन ग्रामीण भागात जात असतांना मराठी बोलायला लागली आहे. त्यामुळे इंग्रजीचा बाऊ करता शिक्षण घ्यावे परीक्षा द्यावी. ज्या पध्दतीने परीक्षेला तुम्हाला सामोरे जावे लागते तसेच निवडणुकीच्या परीक्षेला सामोर जावे लागत असतांना निकालाची भीती तुमच्यासारखीच मनात असते, असा दिलखुलास संवाद सुप्रियाताई सुळे यांनी विद्यार्थ्यांसोबत केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे आज १९ जून रोजी बुलडाण्यात आल्या होत्या. त्यांनी विद्यार्थी, व्यापारी, राजकीय नेते तथा सर्वसामान्यांशी, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधला. पक्ष संघटनेच्या दृष्टीने त्यांचा हा दौरा आयोजित केला होता. सकाळी ११ वाजता येथील शिवसाई ज्ञानपीठच्या वतीने जिल्ह्यातील दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी सुप्रियाताईंनी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला. आपल्याला गुण किती मिळतात यावर यश अपयश अवलंबून नसून आपण एखाद्या क्षेत्रात किती समरस होवून काम करतो हे महत्वाचे असते. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गोष्टीचा ताण घेता अभ्यास करुन परिक्षेला सामोरे जावे. यश मिळवण्यासाठी कितीही प्रयत्न करावे लागले तरी प्रयत्नाची कास सोडू नका, असे आवाहन केले. 
 
विविध कार्यक्रमात मार्गदर्शन : बुलडाणाअर्बन रेसिडेन्सी सभागृहात सृजन संवाद या कार्यक्रमात त्यांनी शहरातील विविध क्षेत्रातील डॉक्टर, इंजिनिअर, व्यावसायीक,प्राध्यापक, समाजसेवक, विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार यांचेशी मनमोकळा संवाद साधला. साखळी येथील नंदनवन या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या संस्थेला भेट देवून मार्गदर्शन केले. दरम्यान त्यांच्यासोबत माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ, जिल्हा परिषद उपाध्यक्षा मंगलाताई संतोष रायपुरे, कृषी सभापती दिनकरराव देशमुख, जि.प. सदस्य तथा तालुका अध्यक्ष डी.एस.लहाने, नरेश शेळके, सविताताई बाहेकर, राधेश्याम चांडक, रेखाताई खेडेकर आदी सहभागी झाले होते. 

मर्यादा संपली अन् भाजपसोबत बसलो : जिल्ह्यातप्रत्येक वेळी काँग्रेस सोबतचा आघाडीचा धर्म पाळला, परंतु, त्यांनी कधी पाळला नाही. अनेकवेळा सोबत राहूनही सन्मान मिळत नसल्याने मर्यादा संपली होती. त्यामुळेच झेडपीत भाजपसोबत युती करुन सत्तेत बसलो, असे डॉ. शिंगणे यांनी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. 

यांचा केला सत्कार 
श्रुतीभडेच, राेशन संचेती, हर्ष चेके, योगेश्वर आरमाळ,अभिजीत गिते, वैष्णवी गुजर,श्वेता राजपुत,ऋतुजा खर्चे, केतकी खाचणे, तेजस शिराळ, स्वराज मोरे, वैभव घुबे, प्रिया देशमुख, सुदर्शन वायाळ, विशाल खराटे, अनुष्का सुपे,मयुर जाधव, पल्लवी जाधव, प्रतिक्षा गवई, स्नेहल चौधरी, गोपाल राहणे, हर्षदा जगताप, मयुरी काकडे, प्राजक्ता पाटील, ऋषिकेश काळे, गौरव वाघमारे, अश्विनी हिवाळे, वैभव शिंदे, ऋत्वीक मानकर, प्रियंका खडके, पुजा लव्हाळे, स्नेहल लहाने, शीतल जाधव, कल्याणी लोखंडे, आकांक्षा ठोकर, वैभव घुबे, साक्षी जाधव, निकीता जाधव, जवकान हसन, मो.इलियास, ऋषिकेश बगाडे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 
विदयार्थी सत्कारात मार्गदर्शन करतांना सुप्रिया सुळे मंचकावर डॉ.राजेंद्र शिंगणे जिल्हाध्यक्ष अॅड नाझेर काझी अन्य. नंदनवन अनाथालयाला भेट देऊन वृक्षारोपण करतांना सुप्रिया सुळे चित्रा वाघ तसेच अन्य छाय प्रशांत सोनुने 
बातम्या आणखी आहेत...