आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सर्जिकल स्ट्राइक करणार; यशवंत सिन्‍हा यांची घाेषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकाेला- ‘दहशतवादाचा  खात्मा करण्यासाठी लष्करी जवानांनी पाकिस्तानात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकप्रमाणेच  अाता देशातील  शेतकऱ्यांच्या  न्यायासाठी  साेमवारपासून अकाेल्यात ‘सर्जिकल स्ट्राइक’ करण्यात येईल’, अशी घाेषणा भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थ मंत्री यशवंत सिन्हा यांनी  रविवारी कापूस- साेयाबीन- धान परिषदेत (कासाेधा) केली. साेमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर  माेर्चा काढून उपोषणही करण्यात येणार  अाहे. सत्तेवर अाल्यानंतर भाजपने अर्थात अाम्हीच अाधी दिलेले वचन पाळले नसल्याची खंतही यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केली.   


शेतकऱ्यांच्या  अार्थिक हक्कांसाठीची  शेतकरी जागर मंचातर्फे अायाेजित कसाेधा परिषदेत ते बाेलत हाेते.  या परिषदेला प्रामुख्याने  शेतकरी नेते शंकर अण्णा धाेंडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, दत्ताजी पवार अादी नेते उपस्थित हाेते. या परिषदेत नऊ ठराव मंजूर करण्यात अाले. यामध्ये भावांतर याेजना लागू करणे, दुष्काळी अनुदान मिळणे,  साेने तारण- कर्जमाफीच्या अटी रद्द कराव्यात, विनाअट आणि सरसकट शेतकरी कर्जमाफी काेणताही निकष न लावता देण्यात यावी, पीक विमा तातडीने देण्यात यावा अादी बाबींचा समावेश हाेता.    


अधिवेशन पुढे ढकलणे अयाेग्य     
सध्या गुजरातमध्ये निवडणूक असल्याने संसदेचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात अाल्याने विराेधकांकडून माेदी सरकारवर चहूबाजूंनी जोरदार टीका हाेत अाहे. अशातच या  मुद्द्यावर भाजपचे नेते यशवंत सिन्हां यांनीही केंद्र सरकारवर ताेफ डागली अाहे.  एखाद्या  राज्यात विधानसभेची निवडणूक असल्याने संसदेचे अधिवेशन अशा प्रकारे पुढे ढकलणे अयाेग्य असल्याचे सिन्हा म्हणाले.    


नाेटबंदीची  उडवली खिल्ली

नाेटबंदीचा परिणाम हाेत असल्याच्या अर्थमंत्री जेटली यांनी केलेल्या दाव्याची सिन्हा यांनी नाव न घेता खिल्ली उडवली. चीनने डाेकलाममधून काढता पाय घेणे, पाकने नमते घेणे, काश्मिरात दगडफेकीच्या घटना कमी हाेणे, हे सर्व नाेटबंदीमुळे झाल्याच्या  सरकारच्या दाव्याची  त्यांनी खिल्ली उडवली.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, खासदार पटाेले, राजू शेट्टी, अामदार कडू गैरहजर... 

बातम्या आणखी आहेत...