आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाभिमानीच्या दणक्याने महावितरणने केली 15 ट्रान्सफार्मर देण्याची कार्यवाही सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - रब्बीच्या हंगामात देयके भरल्यास वीज जोडणी कापण्यात येईल. अशी भूमिका महावितरणने घेतली असून, जळालेल्या रोहित्रामुळे रब्बीचा हंगाम धोक्यात आला असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने संघटनेचे नेते, वस्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अधिकाऱ्यांना घेराव आंदोलन आज नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या आंदोलनात राणा चंदन, जिल्हाध्यक्ष भगवानराव मोरे, शे.रफीक, भारत वाघमारे, संताेष राजपुत, कडुबा मोरे, हरीभाऊ उबरहंडे, शरद राऊत, निलेश राजपुत, रमेश शिरसाठ, विजय उबरहंडे शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. 
 
दरम्यान महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनाची दखल घेत १५ गावांचे रोहित्र देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. एेन रब्बीच्या हंगामात वीज जोडणी कापणे रोहित्र जळाल्यामुळे होणाऱ्या रब्बी पिकांच्या नुकसानाबाबत शेतकरी यांनी रविकांत तुपकर यांना माहिती दिली.ही समस्या लक्षात घेऊन तुपकर हे शेतकरी कार्यकर्त्यांना घेऊन महावितरण अधीक्षक कडाळे यांचे कक्षात आले. त्यांचेसमोर रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. दरम्यान महावितरण कंपनीचे कडाळे,मिश्रा,बंगाळे यांना काेंडण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. या आक्रमक भूमिकेमुळे बुलडाणा तालुक्यातील भादोला,वाडी, रायपुर, साखळी बु., सव चिखली तालुक्यातील कारखेड, गोदरी, सोमठाणा, मकरध्वज खंडाळा, मिसाळवाडी, अंचरवाडी, केळवद आदी १५ गावात रोहित्र बसविण्याचे काम लगेच हाती घेण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...