आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टँकर नदीत कोसळला; सुदैवाने प्राणहानी टळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जऊळका रेल्वे - काटेपूर्णा नदीवरील पुलाचे कठडे तोडून टँकर नदीत कोसळला. सुदैवाने प्राणहानी टळली. बुधवार, २२ रोजी सकाळी झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले. या पुलावर नेहमी अपघात होत असतात परंतु बांधकाम विभागाकडून कायमस्वरुपी काम केले जात नाही, असा अारोप होतो आहे.

प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड येथून जालन्याकडे जाणारा टँकर क्र. जी०७-सी-७१०१ वेगाने जात असताना काटेपूर्णा नदीवरील पुलाचे कठडे तोडून टँकर ५०-६० फूट खोल नदीच्या पात्रात कोसळला. अपघातातील जखमीला उपचारासाठी मालेगाव येथे उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातातील क्लिनर पोहत बाहेर आला तर चालकाला लोकांनी बाहेर काढले. याचठिकाणी झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले होते. बुधवारच्या अपघातामध्ये टँकरचालक सेवकराम मुनसेर रा. दुर्ग आणि क्लिनर लक्रार हे दोघे जखमी झाले. हा पूल धोकादायक झाला असून नागपूर-मुंबई महामार्गावर एखादे वेगवान वाहन गेले तरी हादरतो. या पुलावर अनेक अपघात होत अाहेत. यापूर्वी १४ फेब्रुवारी रोजी मूर्तिजापूर येथील भुंबरे परिवार पुण्याकडे जात असताना रात्री १०.३० च्या सुमारास खड्डे चुकवत असताना अपघात झाला होता.

बांधकाम विभागाकडून या पुलाच्या दुरुस्तीचे काम चालू असून हे काम निकृष्ट दर्जाचे आहे, असा आरोप होत आहे. पुलाचे कठडे व्यवस्थित करणे तसेच खड्डे बुजवले जात आहेत. पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे थातुरमातुर नाही तर पक्के काम करण्याची गरज आहे. नाही तर लाखो रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे. आणखी किती जणांचा प्राण घेणार, असे विचारले जातेय.