आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवस १२; लक्ष्य १३ कोटी, कराचा भरणा करण्याचे नागरिकांना आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्रोत असलेल्या मालमत्ता कराच्या अनुषंगाने मालमत्ता कर विभागाने चालू आर्थिक वर्षात १८ मार्चपर्यंत चालू आणि थकितसह १८ कोटी २१ लाख ४६ हजार ८०३ रुपयांचा कर वसूल केला, तर आता उर्वरित १२ दिवसांत १३ कोटी रुपयांच्या करवसुलीचे आव्हान कर विभागासमोर उभे ठाकले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था कर बंद झाल्यापासून महापालिकेचा मालमत्ता कर विभाग उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे. त्यामुळेच या वर्षी प्रशासनाने मालमत्ता कराकडे लक्ष केंद्रित केले होते. महापालिका अस्तित्वात आल्यापासून रिअसेसमेन्ट झाले नाही. प्रशासनाने रिअसेसमेन्ट करण्याचा प्रयत्नही केला. परंतु, हे काम पूर्ण होऊ शकले नाही. आता हे काम कंत्राटी पद्धतीने दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढील आर्थिक वर्षात मालमत्ता कराच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. चालू आर्थिक वर्षात ११ कोटी ६९ लाख थकित, तर १९ कोटी ४७ लाख चालू अशा एकूण ३१ कोटी १७ लाख रुपयांच्या वसुलीचे आव्हान प्रशासनासमोर होते. साधारणपणे दिवाळीनंतर वसुलीला वेग येतो. परंतु, या वर्षी डिसेंबरपर्यंत संथगतीने वसुली सुरू होती. जानेवारी महिन्यापासून वसुलीने खऱ्या
अर्थानेवेग घेतला, तर या महिन्यात वसुलीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत एकूण १८ कोटी २१ लाख रुपयांची वसुली झाली असून, त्याची टक्केवारी ५८.४३ एवढी आहे. चालू आर्थिक वर्ष संपुष्टात यायला आता केवळ १२ दिवस राहिले असताना १३ कोटी रुपये महापालिका प्रशासनाला वसूल करायचे आहेत. हे आव्हान मालमत्ता कर कसे पेलणार, त्यावरच कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

जानेवारी-फेब्रुवारीत सर्वाधिक वसुली : जानेवारीतदोन कोटी ५७ लाख, तर फेब्रुवारीत पाच कोटी ३१ लाखांची वसुली कर्मचाऱ्यांनी केली. गत वर्षाच्या तुलनेने अनुक्रमे ३७ लाख एक कोटी ४४ लाख रुपये अधिक वसुली झाली. तर गतवर्षात मार्चमध्ये दहा कोटी ७९ लाख रुपये वसूल झाले होते, तर चालू वर्षात मार्चपर्यंत चार कोटी ६० लाख रुपये वसूल झाले.

१२ मार्च एक कोटी ४१ लाख
१४ मार्च एक कोटी ५८ लाख
१५ मार्च २९ लाख, १६ मार्च २६ लाख
१७ मार्च २९ लाख, १८ मार्च २३ लाख रु.

मार्च महिन्यातील वसुली अशी
^नागरिकांनी थकितकराचा भरणा करून अप्रिय कारवाई टाळावी. चालू आर्थिक वर्षातील कराचा भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे.'' विजय पारतवार, करअधीक्षक, मनपा, अकोला
बातम्या आणखी आहेत...