आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघटनांचा विराेध माेडीत काढत समायाेजन प्रक्रियेला पूर्णविराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक समयाेजन प्रक्रिया अखेर साेमवारी पंचायत समिती स्तरावर पार पडली. काही शिक्षक संघटनांनी नियमांवर बाेट ठेवल्याने ही प्रक्रिया रखडली हाेती. त्यामुळे अनेक शाळांमधील शिक्षकांची पदे रिक्त हाेती. परिणामी पाल्यांचे नुकसान हाेत असल्याचा अाराेप पालकांमधून हाेत हाेता. अखेर सर्वच स्तरावरुन दबाव वाढल्याने शिक्षण विभागाने काही शिक्षक संघटनांचा विराेध माेडीत काढत समायाेजन प्रक्रिया यशस्वीपणे राबवली. समायाेजन हाेत असलेल्या शिक्षक-िशक्षिकांचे गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकाऱ्यांनी समुपदेशही केले.
अकाेला जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शिक्षक समायाेजन प्रक्रियाच राबवण्यात अालेली नाही. काही दिवसांपूर्वी शासनाच्या १६ जुलै २०१६च्या पत्रकानुसार समायोजनाची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. या पत्रकात समायोजन करण्याबाबत सूचना देण्यात आली असली तरी १८ मे २०११ च्या शासन निर्णयानुसार समायोजनापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, असे विविध शिक्षक संघटनांचे म्हणणे हाेते. परिणामी २९ जुलै राेजी जिल्हा परिषद प्रशासनाने समायाेजन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली हाेती. काही शिक्षक संघटनांचे पदाधिकारी हे अनेक वर्षांपासून शहरानजीक असलेल्या शाळांवर कार्यरत अाहेत. संघटनांचे पद पुढे करुन हे शिक्षक एकाच शाळेवर कार्यरत अाहेत. काही तर अतिरिक्त असलेले शिक्षक केवळ शैक्षणिक कार्याव्यतिरिक्त इतर कार्यात मग्न असतात. परिणामी अनेक शाळांवर एक ते तीनच शिक्षक-शिक्षिका तर काही शाळांवर जास्त शिक्षक-शिक्षिका असे चित्र हाेते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत हाेते. त्यामुळे यंदा काेणत्याही परिस्थितीत समायाेजनाचीप्रक्रिया राबवण्याची मागणी सर्वच स्तरावरुन झाली हाेती.

तात्काळकार्यमुक्त, लगेच रूजू : अकाेलापंचायत समितीमध्ये पार पडण्यात अालेल्या शिक्षक समायाेजनाच्यावेळी बहुताश: मुख्याध्यापक उपस्थित हाेते. त्यामुळे समुपदेशनानंतर संबंधित शिक्षक-शिक्षिकेला तात्काळ कार्यमुक्त करुन रूजूही करुन घेण्याची प्रक्रिया पार पाडण्यात अाली. मुख्याध्यापक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थित ही प्रक्रिया सुरळीत पार पार पडली.
अकाेला पंचायत समितीअंतर्गत साेमवारी ४२ शिक्षक-शिक्षकांचे समायाेजन करण्यात अाले. यामध्ये मराठी माध्यमांचे ३५ तर उर्दू माध्यमाच्या िशक्षकांचा समावेश अाहे. ही प्रक्रिया गटविकास अधिकारी जी.के. वेले, गट शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार अधीक्षक पृथ्यीराज चव्हाण, प्रवीण माेहाेड, सुहास पाटील यांनी पार पाडली. याप्रसंगी सभापती अरूण पराेडकर प्रामुख्याने उपस्थित हाेते. मराठी माध्यमांचे एकूण ६९ जागा हाेत्या. त्यापैकी ३५ शिक्षक-शिक्षकांचे समायाेजन करण्यात अाले. यामध्ये २४ महिला तर ११ पुरुषांचा समावेश हाेता. उर्दू माध्यमांच्या १८ पैकी जागांचे समायाेजन करण्यात अाले. उर्वरित जागांचे जागांचे समायाेजन िजल्हास्तरावर हाेणार अाहे.

अादेशानंतर झाला मार्ग माेकळा
ग्रामविकास विभागाच्या अवर सचिवांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अाॅगस्ट राेजी पाठवलेल्या पत्रानंतर समायाेजनाचा मार्ग माेकळा झाला हाेता. पत्रात पुढील मुद्दांचा उहापाेह करण्यात अाला हाेता. त्यामुळे पदाेन्नती नियमांवर बाेट ठेवून समायाेजनाला विराेध करणाऱ्या काही शिक्षक संघटनांचे धाबे दणाणले हाेते.

हे हाेते पत्रात नमूद
१)समायाेजन प्रक्रिया ही अटी शर्तींवर अाधािरत नाही
२) पदाेन्नतीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर समायाेजन करावे, असे शासन िनर्णयात अाहे.
३) संचमान्यतेनुसार शिक्षक िनयुक्तीिवना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
४) काेणत्याही िवद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान हाेणार नाही, याची काळजी घ्यावी.
केवळ एकाला सूट, तीही येणार वांध्यात
शिक्षक संघटनांच्या २० पदाधिकाऱ्यांचे सूट मिळवण्यासाठी पत्र प्राप्त झाले हाेते. काही समायाेजनातून सुट मिळण्यासाठी खटाटाेप करीत असल्याचा अाराेप झाल्यावर माहिती संकलनाचे काम हाती घेतले हाेते. त्यानंतर एकालाच सुट दिली. सुट देण्याचे निकष लक्षात घेता सुट देण्याची प्रक्रिया वांद्यात सापडण्याची शक्यता अाहे.

असे अाहेत निकष
१)शिक्षक संघटनेला शासनाची मान्यता अावश्यक अाहे.
२) संघटनेची संहिता सादर करणे बंधनकारक असते.
३) संघटनेत निवड प्रक्रियेच्या सभेचे इतिवृत्त सादर करणे अावश्यक असते.
४) सध्याच्या निवड प्रक्रियेच्या प्राधिकाऱ्याचे पत्र सादर करणे गरजेचे असते.
बातम्या आणखी आहेत...