आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समायाेजनेचे चुकणार ‘गणित’,जिल्ह्यात जागा रिक्त, तरीही विभागीयस्तराचा घाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - खासगीसंस्थांमधील अनुदानित पदावरील शिक्षकांच्या (माध्यमिक) समायाेजन प्रक्रियेत प्रचंड त्रुटी राहिल्याची बाब उजेडात अाली असून, याबाबत जिल्ह्यातील खासदार, अामदारांनी थेट शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवली अाहेत. लाेकप्रतिनिधींनी ही प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी केली अाहे. त्यामुळे या प्रक्रियेतील त्रुटीमुळे समायाेजनेचे ‘गणित’ चुकण्याची शक्यता अाहे.
खासगी संस्थांमधील अनुदानित पदावरील शिक्षकांच्या समायाेजनाची प्रक्रिया राबवण्यासाठी प्रथम १० जून २०१६ राेजी शिक्षण अायुक्तांनी पत्र जारी केले हाेते. या पत्रात अायुक्तांनी समायाेजन प्रक्रिया कशी राबवावी, याबाबतच्या मार्गदर्शक तत्वांचाही समावेश हाेता. त्यानंतर २२ अाॅगस्ट ते २५ अाॅगस्टपर्यंत यादरम्यान, ही प्रक्रिया राबवण्याची सूचना शिक्षण अायुक्तांनी दिली हाेती. मात्र, काही शिक्षण संस्थांनी अावश्यक माहितीच सादर केल्याने अायुक्तांनी तयार करून दिलेले वेळापत्रक पुरते काेलमडले हाेते. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी वेळापत्रक तयार केले हाेते. अखेर सेवाज्येष्ठता यादी प्राप्त झाल्याने २० सप्टेंबरला समायाेजनाची प्रक्रिया पार पडली हाेती. गत अाठवड्यात समायाेजनाचे अादेश जारी झाले.

चाैकशीकरा : खासगीसंस्थांमधील अनुदानित पदावरील शिक्षक (माध्यमिक) समायाेजन प्रक्रियेची चाैकशी करण्याची मागणी लाेकप्रतिनिधींनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या पत्रात केली अाहे. या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून प्रक्रिया विशेष बाब म्हणून पुन्हा राबवावी, असेही जिल्ह्यातील खासदार अामदारांनी पत्रांमध्ये नमूद केले अाहे.

अशी झाली हाेती प्रक्रिया
समायाेजनाचीप्रक्रिया जाहीरपणे राबवली. सभागृहात सर्वच शिक्षकांच्या बसण्याची व्यवस्था केली. त्यांच्यासमाेर दाेन एलसीडी स्क्रिन लावल्या हाेत्या. प्राेजेक्टरच्या माध्यमातून शिक्षक-शिक्षकांसमाेर माहिती येत हाेती. त्यानंतर संबंधित शिक्षक-िशक्षिकेला व्यासपीठावर बाेलावून अधिकारी पर्याय सूचवत हाेते. शिक्षकांच्या साेयीनुसार त्यांची शाळांवर नियुक्ती करण्यात येत हाेती. मात्र, तरीही या प्रक्रियेत त्रुटी राहिल्या अाहेत.

या अाहेत त्रुटी
खासगी संस्थांमधील अनुदानित पदावरील शिक्षकांच्या (माध्यमिक) समायाेजन प्रक्रियेत राहिलेल्या त्रुटीबाबत खासदार संजय धाेत्रे, अामदार गाेवर्धन शर्मा, बळीराम सिरस्कार अामदार प्रकाश भारसाकळे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र दिली. समायाेजन प्रक्रियेत खालीलप्रमाणे त्रुटी असल्याचे पत्रात नमूद केले अाहे.

एकत्रित अाक्षेप अाल्यानंतर निर्णय घेऊ
^माझ्याकडे सध्या शिक्षणाधिकारी पदाचा तात्पुरता प्रभार अाहे. सर्व त्रुटी संकलित झाल्यानंतर त्रुटीचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. वैशालीठग, प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

प्राथमिक शिक्षकांचाही घाेळ कायम
सप्टेंबर महिन्यात खासगी प्राथमिक शिक्षकांच्या समायाेजनाची प्रक्रिया पार पडली. मात्र, गुडधी येथील शाळेतील धर्मराज दिनकर लाहाेळे, रामेश्वर ना. डाबेराव, विलास श्री. घाेरे अस्मिता इंगळे यांना समयाेजन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात अाले नाही. ते सन २०१३-१४ च्या संच मान्यतेनुसार न्यायालयाच्याही निर्णयानुसार समायाेजनास पात्र अाहेत. मात्र, तरीही समायाेजन प्रक्रियेतून डावलण्यात अाल्याचा अाराेप शिक्षकांनी अामदार रणधीर सावरकर यांना दिलेल्या पत्रात केला अाहे. या शिक्षकांना मे २०१५ पासून वेतनही मिळालेले नाही.

À जिल्ह्यात मराठी माध्यमाचे १०८ शिक्षक अतिरिक्त ठरले हाेते. ९३ जागा रिक्त हाेत्या. या ९३ शिक्षकांचे समायाेजन हाेणे अावश्यक हाेते. मात्र, सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे ५१ शिक्षकांचे समायाेजन झाले. ४२ जागा रिक्त असताना जिल्हा स्तरावरील समायाेजन प्रक्रिया बंद हाेऊन केली. ५७ शिक्षक विभागीय स्तरावर पाठवण्याचा निर्णय घेतला. ४२ शिक्षकांचे समायाेजन हाेणे अावश्यक हाेते.

À जागा गणितची, नियुक्ती विज्ञानच्या शिक्षकाची, इयत्ता ते १० साठी गणित विषयाच्या रिक्त जागेवर विज्ञान विषयाच्या शिक्षकाचे समायाेजन केले. त्यामुळे विज्ञानच्या शिक्षकावर अनुभव नसतानाही गणित विषयाचे अध्यापन करण्याची वेळ अाली. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर हाेण्याची शक्यता अाहे. शाळेमध्ये डिएडची जगाा रिक्त हाेती. मात्र, साॅफ्टवेअरमधील दाेषामुळे बीएडच्या अतिरक्त शिक्षकांचे समायाेजन डिएडच्या रिक्त जागी केले.

À सेवा ज्येष्ठतेमध्येही बदल, सेवाज्येष्ठता यादी वर्ग ते ते ते १० या क्रमाने जाहीर केली. मात्र, रिक्त जागांची यादी वर्ग ते १० या एकाच क्रमाने घाेषित केली. त्यामुळे समायाेजन प्रक्रियाही वर्ग ते १० ची सेवा गृहित केल्याने शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेत बदल झाला.

À प्रवर्गातील समयाेजनातही घाेळ, समायाेजन करताना खुल्या प्रवर्गातील प्रथम क्रमांकाच्या अतिरिक्त शिक्षकाला संगणकावर शाळांची नावे दिसत हाेती. त्या शिक्षकाने पैकी एका शाळेची निवड केल्यानंतर विषयाच्या अनुक्रमांक वरील अतिरिक्त शिक्षकास उर्वरित शाळांची नावे दिसणे अपेक्षित हाेते. मात्र, शिक्षकाला एकही शाळा दिसली नाही. त्यामुळे या शिक्षकाला विभागीयस्तरावर पाठवले अाहे.
बातम्या आणखी आहेत...