आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यापक पदवी प्रशिक्षण; जिल्ह्यात 1 हजार 206 जागा अद्यापही रिक्तच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - गेल्या काही वर्षांत डीएड धारक विद्यार्थ्यांची झालेली भरमसाठ वाढ, नोकरीची नसलेली हमी, शिक्षकाच्या नोकरीसाठी लागणारे लाखो रुपये, यासह अन्य कारणांमुळे अध्यापक पदवी प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेअंतर्गत असलेल्या जिल्ह्यातील २९ अध्यापक विद्यालयामधील १८०० जागांपैकी केवळ ५९४ विद्यार्थ्यांनी डीएडसाठी प्रवेश घेतले आहेत. परिणामी आजही १२०६ डीएडच्या जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे डीएडसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ७० टक्के मुलींचा समावेश आहे. डीएड प्रशिक्षणासाठी विद्यार्थी मिळत नसल्यामुळे अनेक खासगी संस्थांची अध्यापक विद्यालये बंद पडण्याचा मार्गावर आहेत. 
 
आजही समाजात शिक्षकाला वेगळे स्थान अाहे. जवळपास दहा ते पंधरा वर्षांपूर्वी अध्यापक पदवी प्रशिक्षण करण्याकडे विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर कल होता. त्यावेळी ८० ते ८५ टक्क्यांवर प्रवेश बंद करण्यात येत हाेता. विद्यार्थ्यांचा कल पाहून जिल्ह्यात अध्यापक विद्यालयाची संख्या भरमसाट वाढली. मागास असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात २९ अध्यापक विद्यालये असून त्यांची प्रवेश क्षमता हजार ८०० आहे. परंतु दरम्यानच्या काळात दुर्मिळ होत चाललेली शिक्षकाची नोकरीची संधी शिक्षक होण्यासाठी मोजावा लागणारा पैसा, यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी डीएलएड प्रशिक्षणाकडे पाठ फिरवली आहेे. त्याचा परिणाम म्हणून केवळ २० जुलै रोजी शेवटच्या फेरीपर्यंत ५९४ विद्यार्थ्यांनी अध्यापक प्रशिक्षणाला पसंती दिली आहे. त्यामध्ये तब्बल ७० टक्के मुलींचा सहभाग आहे, हे विशेष. आजही हजार २०६ जागा रिक्त आहेत. शासकीय अध्यापक विद्यालयाची अशी स्थिती असेल, तर खासगी संस्थाच्या विद्यालयाची काय स्थिती असेल, याचा विचार केलेला बरा. वास्तविक पाहता बुलडाणा जिल्हा हा शिक्षण क्षेत्रात मागासलेला म्हणून ओळखला जातो. परंतु काही दिवसांपूर्वीच लागलेल्या बारावीच्या निकालानंतर केवळ ५९४ विद्यार्थ्यांनी अध्यापक विद्यालयात प्रवेश घेतला आहे. यावरून विद्यार्थ्यांचा डीएलएडकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला असल्याचे दिसून येत आहे. आजही डीएड झालेल्या विद्यार्थ्याकडून अत्यल्प मानधनात शिक्षकाचे काम करून घेण्यात येत आहे. तर अनेक डीएड झालेल्यांना नोकरी मिळत नाही. त्यामुळे त्यांनी नाईलाजास्तव खासगी शिकवणी वर्ग सुरू केले आहेत. बारावीमध्ये ३५ ते ४० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी देखील डीएड करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. 

डीएडचा सुवर्ण काळ इतिहास जमा 
१९९०ते २०१० या दोन दशकात मोठ्या प्रमाणावर डीएड धारकांची संख्या वाढली होती. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी डीएड करून शिक्षकांची नोकरी पत्करली. परंतु मागील सात ते आठ वर्षांपासून या अभ्यासक्रमाला अवकळा प्राप्त झाली. तसेच शिक्षक भरती बंद असल्याने हजारो डीएड धारकांवर बेकार होण्याची वेळ आली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे पाठ फिरवल्यामुळे डीएडचा सुवर्ण काळ इतिहास जमा झाला आहे. त्यामुळेच डीएड कॉलेजला विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. 

शासकीय अध्यापक विद्यालयात फक्त दोन विद्यार्थ्यांचा प्रवेश 
शहरातील शासकीय अध्यापक विद्यालयाची प्रवेश क्षमता ९० आहे. परंतु या विद्यालयात फक्त दोन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत या विद्यालयातील ८८ जागा रिक्त आहेत. 

डीएलएडला मुलींची पसंती 
मुलगी शिकली प्रगती झाली, असे समजले जाते. शिक्षक व्हावे, अशी मुलींची सुद्धा इच्छा असते. त्यामुळे असंख्य मुली बारावीचे शिक्षण झाल्यानंतर डीएड करण्याला प्राधान्य देतात. या वर्षी सुद्धा डीएड प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ७० टक्के मुलींचा सहभाग आहे. 
जिल्ह्यातील डीएलएड महाविद्यालयाची संख्या