आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण सम्राटांना बसणार दणका,पदे कायस्वरुपी रद्दबादल करण्याचे दिले अादेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - समायाेजित शिक्षकांना रूजू घेण्याचे शिक्षाधिकाऱ्यांच्या अादेशाला केराची टाेपली दाखवणाऱ्या शिक्षण सम्राटांचे धाबा अाता राज्याच्या शिक्षण अायुक्तांनी काढलेल्या अादेशामुळे दणादणले असून, शिक्षकांना रुजू करुन घेणाऱ्या संस्थांमधून पदे कायमस्वरुपी रद्दबादल करा, असे त्यांनी अादेशात नमूद केले अाहे. या अादेशानुसार साेमवारी शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पत्र पाठवून मािहती सादर करण्यास सांगितले अाहे.
जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शिक्षक समायाेजन प्रक्रियाच राबविण्यात अाली नाही. १६ जुलै २०१६ च्या शासन पत्रकानुसार समायोजनाची ही प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र शासन निर्णयानुसार समायोजनापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे, अशी मागणी विविध शिक्षक संघटनांकडून करण्यात अाली. परिणामी जिल्हा परिषद प्रशासनाने समायाेजन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली हाेती. त्याच काळात प्रशासनाने शासनाकडून मार्गदर्शनही मागवले. यावर अवर सचिवांनी समायाेजन प्रक्रिया राबवण्याचा अादेश दिला हाेता.

खासगी अनुदानित शाळांमधील प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या अाॅनलाईन समयाेजनाची प्रक्रिया शिक्षण विभागाने सुरु केली. १४ सप्टेंबर राेजी तीन राऊंडमध्ये समायाेजनाची प्रक्रिया पार पडली. याबाबतचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालकांनाही सादर करण्यात अाले हाेते. तसेच या पत्राची प्रत मुख्याध्यापक शिक्षकांनाही पाठवण्यात अाली हाेती. मात्र १३ शिक्षकांना कार्यमुक्त केल्यानंतर रूजू करुन घेतले नाही. त्यानंतर शिक्षकांना रूजू करुन घेण्यात अाले. मात्र, शिक्षक अद्यापही नियुक्तीच्या प्रतिक्षेत अाहेत.

शाळांनावाचला तांत्रिक अडचणींचा पाढा
खासगी प्राथमिक शिक्षक समायाेजनाची प्रक्रिया सप्टेंबर महिन्यात राबवण्यात अाली. १३ पैकी प्रथम दाेन नंतर दाेन अशा एकूण चारच शिक्षकांना संबंधित शैक्षणिक संस्थांनी शाळांमध्ये रूजू करुन घेतले. त्यामुळे उर्वरित शिक्षकांना रूजू करुन घेणाऱ्या शिक्षण संस्थांना शिक्षण विभागाने पत्र दिले हाेते. समायाेजनानंतर शिक्षकांना रूजू करुन घेण्यात काेणत्या अडचणी येत अाहेत, याबाबत संस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले हाेते. या संस्थांच्या तीन शाळांचे शिक्षक नियुक्तीच्या प्रतिक्षेत अाहेत.

अधिकाऱ्यांना नाही जुमानले
समायाेजितशिक्षकांना रुजू करुन घेण्यासाठी शिक्षण विभागाने तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली हाेती. मूिर्तजापूर येथील एका शाळेत तर स्वत: शिक्षणाधिकारी शिक्षकांना रजू करुन घेण्यासाठी गेले. मात्र या संस्थेचे व्यवस्थापन शाळाने शिक्षणाधिकाऱ्यांनाही जुमानले नाही.

कार्यवाही ची शिफारस
तीन शाळांनी समायाेजित शिक्षकांना शिक्षकांना रूजू करुन घेतले नाही. शिक्षकांना रूजू करुन घेण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली हाेती. त्यामुळे संबंधित शाळांना पत्र दिले अाहे. कार्यवाही करण्याची शिफारस शासनाकडे करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी सांगितले.

Àकाही संस्था विविध कारणं पुढे करुन समायाेजित शिक्षकांना रूजू करुन घेण्यास नकार देत अाहेत. तसेच समायाेनासाठी काही संस्थांनी शाळािनहाय रिक्त पदांची मािहती अाॅनलाईन पद्धतीने भरलेली नाही.

Àसमायाेजित शिक्षकास रूजू करुन घेतल्यास संबंधित संस्थेच्या शाळेतील सदरचे पद कायमस्वरुपी रद्दबादल करण्याच्या कार्यवाही शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी. या कार्यवाहीचा अहवाल शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालयातर्फे सादर करण्यात यावा, असे शिक्षण अायुक्तांनी अादेशात नमूद केले अाहे.

Àसमायाेजित शिक्षकांना रूजू घेतल्यास त्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण हाेणार नाही, यासाठी काेणत्या शाळेतून त्यांचे वेतन काढायचे, याबाबतचा निर्णय शिक्षणाधिकाऱ्यांना घ्यावा. शिक्षक विनावेतन राहणार नाहीत, याचा खबरदारी घ्यावी, असेही शिक्षण अायुक्तांनी अादेशात स्पष्ट केले.
बातम्या आणखी आहेत...