आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आरडीजी’ प्रशासन विरोधात तहसीलदारांची ठाण्यात तक्रार, पोलिसांनी प्रकरण ठेवले चौकशीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आरडीजी महिला महाविद्यालयात तहसीलदारांसह चौघे निवडणुकीची व्यवस्था करण्यासाठी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचे आदेशाचे पालन केल्यामुळे कर्मचारी तहसीलदार यांच्यात बाचाबाची झाली. उलट येथील कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांसह चौघे दारू पिऊन आल्याचा आरोप करत त्यांचे मेडिकल करावे, असे म्हटले. नंतर प्राचार्या डॉ. अंजली राजवाडे तहसीलदार राजेश्वर हांडे यांच्यात तू तू मै मै झाली. या प्रकरणी तहसीलदारांतर्फे सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी ही तक्रार चौकशीत ठेवल्याची माहिती आहे.
 
फेब्रुवारी रोजी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असल्याने फेब्रुवारी रोजी आरडीजी महिला महाविद्यालयात मतदान केंद्रासाठी खोल्या कर्मचारी उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी तहसिल कार्यालयातील मंडळ अधिकारी सोनोने एक कर्मचारी असे दोघे गेले होते. या वेळी त्यांनी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे हजेरीपुस्तकावरून पाच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची मागणी केली. या वेळी तहसील कार्यालयाची तथा निवडणूक निर्णय विभागाची ऑर्डर महाविद्यालयातील कर्मचारी सुधाकर बावणे यांनी आधी नाकारली. त्यानंतर मंउळ अधिकाऱ्यांनी तहसीलदारांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर तहसीलदार राजेश्वर हांडे, मंडळ अधिकारी सोनोन, तलाठी दामोदर दोघे हे महाविद्यालयात पोहोचले. ते महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली राजवाडे यांच्या कक्षात गेले. तेथे तहसीलदार राजेश्वर हांडे प्राचार्या राजवाडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर तहसीलदार त्यांच्या सोबतचे अधिकारी बाहेर गेल्यानंतर पुन्हा कर्मचारी सुधाकर बावणे त्यांच्यात जोरजोरात वाद झाले. त्यानंतर येथील कर्मचाऱ्यांनी तहसीलदारांसह चौघे दारू पिऊन असल्याचा आरोप केला त्यांचे मेडिकल करण्याची मागणी केली. घटना गांर्भीयाने घेत तहसीलदार यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दिली. ही तक्रार पोलिसांनी चौकशीत ठेवली आहे. 

चोराच्या उलट्या बोंबा 
तहसीलदार अधिकाऱ्यांचे वागणे योग्य नव्हते. कर्मचाऱ्यांनी बावणे यांना लोटपाट केली. निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांच्या कानावर घडलेला प्रकार टाकला होता. आम्ही सहकार्य करूनही जर पोलिसात तक्रार केली असेल तर चोरांच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे - डॉ.अंजली राजवाडे, प्राचार्य 
 
पिऊन आल्याचा आरोप 
तलाठी कदम हे आरडीजीमध्ये गेल्यानंतर तेथील चतुर्थश्रेणी कर्मचारी बावणे यांनी ऑर्डर घेण्यास नकार दिला. प्राचार्यांनी निवडणूक कामात सहकार्य करता कर्मचाऱ्यांची बाजू घेतली. यानंतर निवडणूक कामासाठी इमारत उपलब्ध करून देणार नाही असे म्हटले. आम्ही कोणतेही तोंडी आदेश दिले नव्हते - राजेश्वर हांडे, तहसीलदार, अकोला. 
बातम्या आणखी आहेत...