आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांगा अाता परीक्षा द्यावी का मुलाखत? तारखेत बदल करण्याची डॉक्टरांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सार्वजनिक अाराेग्य सेवेच्या मुलाखती अाणि एमबीबीएसनंतरच्या अभ्यासक्रमासाठीची परीक्षा एकाच दिवशी अाल्याने अाता परीक्षा द्यावी का मुलाखत, असा प्रश्न उमेदवारांना पडला अाहे. महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट संवर्गातील वैद्यकीय अधिकारी पदाच्या मुलाखती ३० जून रोजी जिल्ह्याच्या ठिकाणी हाेणार आहेत. या मुलाखती जिल्हाधिकारी, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, समाजकल्याण अधिकारी आदिवासी विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या निवड मंडळाद्वारे घेण्यात येत आहेत. मात्र, त्याच दिवशी डॉक्टरांची डीएनबी ही नियोजित परीक्षा आहे. डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बाेर्ड या परीक्षेसाठी एप्रिल १६ मध्येच अर्ज भरण्यात आले होते. त्यामुळे ही परीक्षा ३० जून ते जुलैदरम्यान घेण्यात येत आहे. एकतर परीक्षा किंवा मुलाखत यापैकी एकाची तारीख बदलावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे.
बातम्या आणखी आहेत...