आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायम सोडून फक्त तात्पुरत्या उपाययोजनांकडेच ‘लक्ष’, जिल्ह्याची पाणी टंचाई 25.68 कोटींची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पाणीटंचाई निवारणार्थ करावे लागणारे प्रशासकीय नियोजन यावर्षीही पूर्णत्वास गेले असून, त्यासाठी तब्बल २५ कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद केली आहे. विशेष असे की यापैकी सर्वाधिक २३ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च केवळ नळ योजनांच्या विशेष दुरुस्तीवर केला जाणार आहे. 

प्रशासनाच्या या नियोजनामुळे कायमस्वरूपी उपाययोजनांऐवजी दरवर्षी असे तकलादू उपायच का शोधले जातात, असा प्रश्न पुढे आला असून, ही डागडूजी नेमकी कोणाच्या पथ्यावर पडेल, याचा शोध घेणे सुरू झाले अाहे. या उपाययोजनांमुळे सामान्यांना खरेच पाणी मिळणार की, आर्थिक अनागोंदी वाढणार, अशी विचारणा होत आहे. सन २०१६-१७ सालची पाणी टंचाई जाणून घेऊन त्यासाठीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच एक बैठक घेतली. बैठकीतच जिल्हा परिषदेच्या वतीने तिमाही उपाययोजनांचा गोषवारा मांडला जाऊन त्यासाठीच्या खर्चाची तरतूद केली गेली. त्यानंतर सर्वानुमते त्या खर्चाला मंजुरीही दिली. 

प्रशासनाने केलेल्या नियोजनानुसार जिल्हाभरात विविध १९८ उपाययोजनांवर हा खर्च केला जाणार आहे. त्यापैकी सर्वाधिक १८ कोटी ४३ लाख ५० हजार रुपये एकट्या अकोला तालुक्यासाठी असून, उर्वरित रक्कम इतर सहा तालुक्यांतील उपाययोजनांवर खर्च केली जाणार आहे. अकोला तालुक्याच्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या २० योजना राबवायच्या आहेत. यामध्ये नवीन विंधन विहीरी, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरती पुरक नळ योजना, खासगी विहीरींचे अधिग्रहण आणि प्रगतीपथावरील नळ योजनांची कामे आदींचा समावेश आहे. कमी-अधिक प्रमाणात अशाच उपाययोजना इतरही तालुक्यांत केल्या जाणार असून, त्यासाठी शिर्षनिहाय खर्चाचा गोषवाराही निश्चित केला आहे. 
 
बार्शिटाकळीत टँकर दौडणार: 
बार्शि टाकळीतालुक्याच्या एका गावात पुरेसा स्रोत नसल्याने त्याठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. अलीकडच्या नियोजनानुसार या कामासाठी लाखांची तरतूद आहे. ऑक्टोबर ते डिसंेंबर दरम्यान अडचण नव्हती. परंतु जानेवारी ते मार्च एप्रिल ते जून या दोन्ही तिमाहीमध्ये टँकरनेच पाणी पुरवठा करावा लागेल, असे प्रशासनाचे मत आहे. 
 
कायम उपाययोजना 
तात्पुरत्या ऐवजी कायम स्वरुपी उपाययोजनांवर भर देणे अधिक श्रेयस्कर आहे. यावर्षीसाठी व्यक्त झालेला पावसाचा अंदाज आणि जलयुक्त शिवार योजनेंतर्गत भूजल पातळी वाढवलेले यश यामुळे भविष्यात कायमस्वरुपी उपाययोजनांनाही वेग येईल. जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी, अकोला. 
 
गतवर्षी पाणी टंचाई २२ कोटींची 
जिल्ह्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गतवर्षी २२ कोटी २६ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा खर्च केला होता. ही रक्कम टप्प्याटप्प्याने दिली जात असून, कोटी २६ लाख ५४५ कोटी लाख २५ हजार ७०० रुपये असे शेवटचे दोन टप्पे अलीकडेच प्राप्त झाले. विविध कामे या रकमेतून केली गेली. 
बातम्या आणखी आहेत...