आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"ते' कुटुंब केले ओडिशाला रवाना, अोडिशातील लिपिकाचा रेल्वेमध्ये मृत्यू प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी- अकोल्यात वडिलांना चिताग्नी देऊन चार वर्षीय चिमुकला आपल्या आई बहिणीसोबत शनिवारी ओडिशाला निघाला. रेल्वेत प्रवासादरम्यान, मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना तहसीलदार संतोष शिंदे यांनी शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी अजमेर पुरी एक्स्प्रेसने सायंकाळी वाजता रवाना केले.

ओडिशातील कनश ता. पुरी येथील रहिवासी सुशांत पाईकराय वय ४५ यांचा १५ ऑक्टोबर रोजी ओडिशाला रेल्वेने जात असताना हृदयविकाराच्या झटक्याने अकोलानजीक मृत्यू झाला. अकोला रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी पोलिसांचा सहारा घेतला. या प्रकाराची माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना मिळाल्यानंतर त्यांनी तहसीलदार संतोष शिंदे पथकाला तत्काळ रेल्वे स्टेशनवर पाठवले होते. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, आरपीएफ, जीआरएफ महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्या व्यक्तीचे शवविच्छेदन केल्यानंतर जुने शहरातील मोहता मिल मोक्षधाममध्ये अंत्यसंंस्कार करण्यात आले. मोक्षधाममध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी सायंकाळी अस्थी मृतकाची पत्नी अनुपमा मुलगा प्रियांशूकडे सोपवल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार संतोष शिंदे यांनी या कुटुंबाला शनिवारी सायंकाळी अजमेर पुरी एक्स्प्रेसने रवाना केले.

या वेळी त्यांच्यासोबत खानपानासह आवश्यक साहित्य दिले. याप्रसंगी आरपीएफ ठाणा निरीक्षक अमरिश बेहरा, अकोला तहसीलचे मंडळ अधिकारी अजय तेलगोटे, तलाठी बी. एस. थिटे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांचा माणुसकीचा परिचय
परराज्यातीलएका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे कळताच जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यामधील संवेदनशील मनाचा माणूस जागृत झाला. त्यांनी तत्काळ तहसीलदारांना पाठवून त्या कुटुंबाला सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशील वागणुकीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.