आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर ‘त्या’ युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू, मनपाच्या इमारतीवरून घेतली हाेती उडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- महापालिकेच्याप्रशासकीय इमारतीवरून खाली पडलेल्या युवकाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी या युवकाने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती.
चिखलपुरा येथे राहणारा नीलेश प्यारेलाल पाली (३०), असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील महापालिकेत सफाई कर्मचारी होते. वडिलांच्या नंतर आपणास सफाई कामगार म्हणून कामावर घ्यावे, यासाठी त्याने अनेक वेळा महापालिकेचे उंबरठे झिजवले होते. मात्र, त्याला प्रशासनाने दाद दिल्यामुळे तो अनेक दिवसांपासून तणावात होता. रविवारी दुपारी चार वाजता त्याने धुंदीमध्ये सुरक्षा रक्षकाच्या समोरच महापालिकेत प्रवेश केला. त्यानंतर तो थेट तिसऱ्या मजल्यावर चढला. या वेळी त्याच्याकडे कुणाचेही लक्ष नव्हते, असे सुरक्षा रक्षकांचे म्हणणे आहे. त्याच्या पडण्याचा आवाज आल्यामुळे तो खाली पडल्याचे माहीत झाले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या सुरक्षा रक्षकाने सिटी कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी जखमी अवस्थेत पडलेल्या नीलेशला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केल्यानंतर रात्री उशिरा त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले हाेते.

१५ ते २० मिनिटे होता पडून
नीलेशपाली हा युवक इमारतीवरून पडल्यानंतर तो १५ ते २० मिनिटे तसाच पडून होता. पोलिस आल्याशिवाय त्याला कुणीही हातसुद्धा लावला नव्हता. यादरम्यान सुरक्षा रक्षकांकरवी आधी प्रशासनाला माहिती देण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. तोपर्यंत युवक त्याच अवस्थेत पडून होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले होते.

टिनपत्रे वाकली होती
नीलेशपाली पडल्यानंतर टिनपत्र्यासह लोखंडी खांबही वाकला होता. त्यानंतर तो खाली कोसळला. त्याच्या डोक्यावर गंभीर मार लागल्यामुळे, तो बेशुद्धावस्थेत होता.