आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Annual Gathering Of The Inaugural Of Panjabrao Deshmukh

फक्त इच्छाशक्तीच्या जोरावरच मिळते यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आपल्याला अपेक्षित ते यश मिळवण्यासाठी प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. इच्छाशक्ती प्रयत्नांच्या जोरावरच यश मिळते, असे प्रतिपादन मराठी सिने अभिनेता अमित्रीयान यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयद्वारा आयोजित ५६ व्या "कलामंथन २०१६’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद््घाटन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात शुक्रवारी झाले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यशाचा मंत्र दिला. मूळ अकोल्यातील अमित्रीयान याने त्याचा सिने सृष्टीतील प्रवास उलगडला.
अमित्रीयानने आपले सिने करिअर अतिशय संघर्षातून सुरू करून आज स्वतःला सिद्ध केले आहे. यापासून आपणही प्रेरणा घेत आयुष्यात यशाचे शिखर गाठावे, असे आवाहन सोहळ्याचे अध्यक्ष कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. प्रदीप इंगोले यांनी केले. विद्यार्थी कल्याण अधिकारी संजय कोकाटे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एस. माने यांनी स्नेहसंमेलनाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी आयोजन समितीचे सचिव डॉ. व्ही. एल. गावंडे, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. पी. बी. उमाळे, विद्यार्थी प्रतिनिधी संगमेश्वर केंद्रे, रश्मी राऊत, विष्णू घाडगे, प्रीती दांदळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित चित्रफीत, अभिनेता अमित्रीयान यांचा परिचय करून देणारी चित्रफीत दाखवण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात सादर केलेल्या लोकनृत्याने वाहवा मिळवली.