आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोला: भाजप उमेदवाराच्या घरातून पोलिसांनी रोकड केली जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भारतीय जनता पक्षाच्या अकोट फैल परिसरातील प्रभाग क्रमांक च्या अधिकृत उमेदवार अनिता राजेश चौधरी यांच्या घरातून प्रचार संपण्याच्या पाच तासांपूर्वी रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास पोलिसांनी लाख १५ हजार रुपयांची रोकड जप्त केली. मतदारांना पैसे वाटप होत असल्याच्या संशयावरून अकोट फैल पोलिसांनी कारवाई केली. 
 
कारवाईनंतर भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांनी अकोट फैल पोलिस ठाण्यात धाव घेतली. या वेळी आमदार सावरकर पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. सावरकर यांनी पोलिसांना धमकी दिल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. 

रविवारी सकाळी आमदार गोवर्धन शर्मा भाजपचे पदाधिकारी उमेदवार अनिता राजेश चौधरी यांनी प्रचार रॅली काढली होती. दुपारी रॅली संपल्यानंतर उमेदवार त्यांच्या घरी गेल्या. 
दरम्यान, त्यांच्या घरी मतदारांना प्रलोभन दाखवून पैसे वाटप होत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळाली. माहितीवरून ठाणेदार तिरुपती राणे, महिला पोलिस उपनिरीक्षक छाया वाघ यांच्यासह पोलिसांचे पथक भाजपच्या उमेदवार अनिता राजेश चौधरी यांच्या घरी पोहोचले. घरात पोलिसांना १२ ते १५ मतदार दिसून आले. 
 
घराची झडती घेतली असता पोलिसांनी घरातून लाख १५ हजार ताब्यात घेतले. पोलिस कारवाईला उमेदवाराने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी दबावाला बळी पडता कारवाई केली. त्यानंतर भाजपचे आमदार सावरकर यांच्यासह पक्षातील पदाधिकाऱ्यांना कारवाईची माहिती दिल्यानंतर आमदार रणधीर सावरकर पोलिस ठाण्यात पोहोचले. भाजप उमेदवाराच्या घरी कारवाईसाठी कुणाची परवानगी घेतली. तुमच्याकडे सर्च वारंट आहे काय असे म्हणून पोलिसांचा पानउतारा केला. पोलिसांनी कायदा समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता आमदार चिडले या वेळी ते पोलिसांना परिणाम भोगण्याचेही सांगायला विसरले नाहीत. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वर्दी उतरवण्यापर्यंत विषय गेल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक उमेश माने पाटील ठाण्यात पोहोचले होते. 
 
 
आमदारांचे इंग्रजीत संभाषण 
आमदार ठाण्यात पोहोचले तेव्हा ते पोलिसांवर गरम झाले. कारवाई कायदेशीर असल्याचे पोलिसांनी सांगितल्यानंतर तुम्ही कुणाशी बोलता..., असे म्हणून तुम्ही चुकीची कारवाई केली. तुम्ही कारवाईपूूर्वी स्टेशन डायरीत नाेंद टाकली काय, असे म्हणून डायरी न्याहाळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदार साहेबांनी इंग्रजीतून संभाषण केल्याचेही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. याबाबत आमदार सावरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. 

पोलिसांनी केले कारवाईचे चित्रीकरण 
पोलिसांनी कारवाई करताना पारदर्शीपणा ठेवला. या वेळी त्यांनी चित्रिकरणही केले आहे. उमेदवाराच्या घराचे पूर्ण चित्रीकरण पोलिसांनी केले. कारवाईदरम्यान कुठलाही अतिरेक झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

पोलिसांचे आयकर विभागाला पत्र 
रोकड ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी आयकर विभागाला पोलिसांनी पत्र दिल्याची माहिती आहे. आयकर विभाग या पैशाबाबत चौकशी करेल. समाधानकारक कागदपत्र मिळाल्यानंतर उमेदवाराला ती परत करण्यात येणार अाहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...