आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारने दिली ट्रकला धडक; दोन जण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर/ जामठी बुद्रूक - राष्ट्रीय महामार्गावर माना फाट्यानजीक २९ जुलै रोजी दोन ट्रकचा अपघात झाला, त्याच ठिकाणी ३० जुलै रोजी पहाटे एक वाजताच्या सुमारास उभ्या असलेल्या ट्रकवर हुंडाई आयटेन कार आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये कारचालकासह दोघे जागीच ठार झाले, तर तिसरा गंभीर जखमी आहे. ट्रकचालक फरार आहे.
भरधाव असलेली अमरावतीकडे जाणारी हुंडाई आयटेन कार (क्रमांक एमएच ३०, पी ३२३०) ही ट्रक (क्रमांक एमएच ४०, ५९९३) वर जाऊन आदळली. गंभीर जखमीला उपचारार्थ अकोला येथे हलवण्यात आले आहे. अपघातात मृत पावलेल्यांमध्ये उपसरपंच नासीर खाँ जरावर खाँ (३०) रा. अकोटफैल, कारचालक शशांक विनायक कांगटे (२५), रा. रामदासपेठ यांचा समावेश असून, शिलोडा येथील सरपंच दिलीप पाटील सरोदे (३०) हे गंभीर जखमी झाले आहेत. कारचालक शशांक कांगटे अकोला येथे कंत्राटदार असल्याची माहिती मिळाली आहे.

दोन्ही मृतकांचे मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रुग्णालयात दुपारी दोन वाजता पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास ठाणेदार अशोक वाघमारे यांच्या मार्गदर्शनात नरेंद्र पद््मणे, महादेव भोजने, सुमीत मोहड, चंद्रकांत अवताडे, विनोद तायडे करत आहेत.

कारचा झाला चेंदामेंदा
अपघातएवढा भीषण होता की, दोन जण जागीच ठार झाले. तसेच कारचे समोरील दर्शनी भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. दोन्ही वाहने नागपूरकडेच जात होती. ट्रक हा उभा होता. त्यावर पाठीमागून हंुडाई कार जावून आदळली. सकाळी अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी येथे गर्दी केली होती.