आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतकाच्या नावे सादर केलेल्या खदानीचा प्रस्ताव अखेर रद्द, राज्य पर्यावरण अाघात मूल्यांकन प्राधिकरणाचा निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - मृतकाच्यानावे सादर करण्यात अालेल्या गिट्टी खदानाची प्रस्ताव राज्य पर्यावरण अाघात मूल्यांकन प्राधिकरणाने (एसईअायएए) रद्द केला. हा प्रस्ताव अाकाेट तालुक्यातून सादर करण्यात अाला हाेता. याप्रकरणी महसूल विभागाने चाैकशी करुन प्रस्ताव पुढील कारवाईसाठी पर्यावरण विभागाला सादर केला हाेता. याप्रकारावर प्रथम दै. दिव्य मराठीने २२ जून २०६ राेजी प्रकाशझाेत टाकला हाेता. 

जिल्ह्यात अवैध गाैणखनीज उत्खननाच्या घटना नेहमीच उजेडात येतात. अनेकदा महसू अािण पाेिलस प्रशानसन संयुक्तपणे माेिहमही राबवते. या माेहिमेमध्ये वाहने जप्त करुन दंडही अाकारण्यात येताे. दरम्यान अकाेट तालुक्यातील रुधाडी खटकाळी येथील कमलाबाई शंकरराव साेयाम राजेंद्र बजरंगलाल अग्रवाल या दाेन मृतकांच्या नावे गिट्टी खदानचा प्रस्ताव राज्य पर्यावरण समितीला सादर करण्यात अाला. 

याप्रकरणी विठ्ठलराव गावंडे यांनी १५ अाॅक्टाेबर २०१६ राेजी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांना अहवाल पाठवला. कमलाबाई साेयाम यांचा डिसेंबर २००७ राेजी अािण राजेंद्र अग्रवाल यांना मे २००९ राेजी मृत्यू झाल्याचे अाहवालात स्पष्ट करण्यात अाले. मात्र असे असतानाही मृतकांच्या नावे गिट्टी खदानीचा प्रस्ताव २१ एप्रिल राेजी पर्यावरण समितीकडे सादर करण्यात अाल्याचा प्रकार घडला हाेता. 

दरम्यान राज्य पर्यावरण अाघात मूल्याकन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मृतकाच्या नावे सादर केलेल्या गिट्टी खदनीचा प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याचा निर्णय घेण्यात अाला.
 
तहसीलदारांकडून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर : मृतकाच्यानावे गिट्टी खदानाचा प्रस्ताव सादर झाल्याप्रकरणी मंडळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालाचा तहसीलदारांनी अभ्यास केला. त्यानंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. या अहवालात त्यांनी पुढील बाबींचा उहापाेह केला हाेता.
१) कमलाबाई साेयाम यांचा  डिसेंबर राेजी मृत्यू झाला असून, त्याबाबतचे ग्रामपंचायतने जारी केलेले प्रमाणपत्रही उपलब्ध अाहे. १० जून २००८ राेजी कमलाबाई यांच्या वासीची नाेंद करण्यात अाली. 
२) गिट्टी खदानीबाबत पर्यावरण समितीकडे २१ एप्रिल २०१३ राेजी प्रस्ताव सादर करण्यात अाला. मात्र प्रस्ताव सादर करताना ना साेयाम या हयात हाेत्या, ना त्यांच्यानावे जमीन हाेती. 
३) राजेंद्र बजरंगलाल अग्रवाल यांचा मृत्यू मे २००९ राेजी झाल्याचे प्रमाणपत्र नगर परिषदेने दिले हाेते. फेरफारद्वारे १४ नाेव्हेंबर २०१० २३ सप्टेंबर २०१२ राेजी नेंद करण्यात अाली., मात्र पर्यावरण समितीकडे प्रस्तात सादर करण्यात अालेल्या वेळी अग्रवाल हे जीवंत नव्हते. 

अादेशाचा अभ्यास 
गिट्टी खदानीला परवानगी दिल्याने खनीपट्टा देण्यात येणार नाही. याबाबतच्या अादेशाचा अभ्यास करण्यात येणार अाहे. काही मार्गदर्शक तत्वे जारी झाली अाहेत, काय हेही पाहण्यात येतील. त्यानंतरच वरिष्ठांशी चर्चा करुन पुढील कार्यवाहीचा निर्णय घेण्यात येईल - रामेश्वर पुरी, जिल्हा खनीकर्म अधिकारी. 

पुढे काय? 
मृतकांच्यानावे गिट्टी खदानाची प्रस्ताव रद्द केला असला तरी काही प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाही. यामध्ये हा प्रकार काेणी केला, त्याला जबाबदार काेण, यात काही अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग अाहे काय, याची निष्पक्ष चाैकशी दाेषी अाढळून अाल्यास त्यांच्यावर कारवाई हाेईल काय या प्रश्नांचा समावेश अाहे. याबाबत कारवाईसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून हाेत अाहे. 

अशी झाली हाेती सखाेल चाैकशी 
अाकाेट तालुक्यातील मृतकाच्या नावे गिट्टी खदानाचा प्रस्ताव सादर करण्याची तक्रार झाल्यानंतर प्रशासनात खळबळ माजली हाेती. त्यानंतर महसूल प्रशासनाने चाैकशीला प्रारंभ केला. अकाेलखेडच्या मंडळ अधिकाऱ्यांनी प्रथम चाैकशी केली. त्यांनी वरिष्ठांना सादर केलेल्या अहवालात कमलाबाई साेयाम राजेंद्र अग्रवाल यांचा मृत्यू केव्हा, त्यांची काेठे जमीन अाहे, या जमिनीचे क्षेत्रफळ किती अाह, याबाबत मािहती नाेंदवली. त्यानंतर त्यांनी अहवाल २२ मार्च २०१६ राेजी तहसीलदारांना सादर केले.