आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या निवासस्थानांसह एसपी कार्यालयाचा मार्ग मोकळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - निमवाडीयेथे पोलिस अधिकारी निवासस्थान बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीलासुद्धा हिरवी झेंडी मिळाली आहे. पोलिसांच्या कल्याणासाठी पहिल्यांदाच जिल्ह्यात एवढी मोठी तरतूद करण्यात आली अाहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या पाठपुराव्यामुळे निवासस्थानांचा गंभीर बनलेला मुद्दा निकाली निघाला आहे.
शहरासह जिल्ह्यातील पोलिस निवासस्थाने खुराडे बनली आहेत. त्यामुळे पोलिस निवासस्थानांचा प्रश्न निकाली निघावा, यासाठी "दिव्य मराठी'ने वारंवार वृत्तमालिका प्रकाशित केली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा हे दीड वर्षांपूर्वी रुजू झाल्यानंतर त्यांनी पोलिस निवासस्थानांचा प्रश्न किती गंभीर आहे, हे वेळोवेळी शासनाला पटवून दिले. त्यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर निमवाडीत ३३५ पोलिस निवासस्थाने, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाची प्रशासकीय इमारत, बॉम्ब शोधक नाशक पथक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नवनिर्मित पोलिस ठाणे खदानसाठी प्रशासकीय इमारत, अकोट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाची इमारत नियंत्रण कक्षासह बांधकाम, बाळापूर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाची प्रशासकीय इमारत नियंत्रण कक्षासह बांधकाम, पातूर पोलिस ठाण्यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांकरिता विश्रांमगृहाच्या बांधकामाला तत्वत: मंजुरात मिळाली आहे.

निवासस्थानांसाठीचे पाच कोटी गेले होते परत : पोलिसांच्यानिवासस्थानांची दुरवस्था झाल्यामुळे २०१४-१५च्या आर्थिक वर्षासाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी डिसेंबर २०१४ च्या अतिरिक्त बजेटमध्ये पोलिस वसाहतीच्या दुरुस्तीसाठी कोटी रुपये मंजूर केले होते. तो निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करणे अपेक्षित होते. त्यानुसार कोटी ३४ लाख ७८ हजार रुपये उपलब्ध झाले होते. मात्र, ही रक्कम उपलब्ध होऊनही निविदा प्रक्रिया निघाल्यामुळे ही रक्कम परत गेली होती.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील आणि जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांच्या पाठपुराव्यावर पाणी फेरले होते. मात्र, हा निधी पुन्हा आणण्यात जिल्हा पोलिस अधीक्षकांना यश आले आहे.

खदानपोलिस ठाण्यात एसपी कार्यालय : खदानपोलिस ठाण्याच्या आवारात पोलिस अधीक्षक कार्यालयाची प्रशासकीय इमारत प्रस्तावित आहे. या भव्य जागेमध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय होणार आहे, तर त्याच परिसरात खदान पोलिस ठाणेसुद्धा नव्याने बांधण्यात येणार आहे.
अकोट एसडीपीओ इमारत, नियंत्रण कक्ष बांधकाम

लवकरच कामाला सुरुवात होईल
^पोलिस निवासस्थानांचाप्रश्न गंभीर आहे. पडक्या घरात आमचे पोलिस राहत असल्याचे शल्य आहे. त्यामुळे पोलिसांच्या निवासस्थानांची समस्या सुटणे महत्त्वाचे होते. वरिष्ठस्तरावरून हा विषय सकारात्मक घेण्यात आल्यामुळे प्रश्न निकाली निघाला आहे. लवकरच निवासस्थानांच्या कामाला सुरुवात होणार आहे. आता आम्ही पोलिसांसाठी पाहिजे तशी अद्ययावत निवासस्थाने लवकरच पूर्णत्वास नेणार आहोत. त्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. '' चंद्र किशोर मीणा, जिल्हापोलिस अधीक्षक, अकोला

{नवनिर्मित पोलिस ठाणे खदानसाठी प्रशासकीय इमारत
९५.४५ लाख रुपये
{बॉम्ब शोधक नाशक पथक प्रशासकीय इमारतीचे बांधकाम
१००.१२ लाख रुपये
{जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाची प्रशासकीय इमारत
९५९.३० लाख रुपये
{निमवाडीत ३३५ निवासस्थाने
५९ कोटी २१ लाख ११ हजार ४८७

बातम्या आणखी आहेत...