आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Education Department's Office Of Independent Accounting Officer

"लेखाधिकारी' अंधारात, वीज वितरण कंपनीने नाकारला वीजजोडणीचा अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - खासगी शैक्षणिक संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या पडताळणीसह अन्य कामासाठी शासनाने शिक्षण विभागाच्या स्वतंत्र लेखाधिकारी कार्यालयाची निर्मिती केली आहे. जिल्हा मुख्यालयी असलेल्या येथील या कार्यालयाचा कारभार मात्र वीजपुरवठाच नसल्याने वर्षभरापासून अंधारात सुरू आहे. वीज वितरण कंपनीने जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडे असलेल्या देयकांच्या थकबाकीमुळे या कार्यालयासही वीजजोडणीस नकार दर्शवल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी लेखाधिकारी कार्यालय कायमस्वरुपी अंधारात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिक्षणाच्या सार्वत्रिकीरणासाठी खासगी शिक्षण संस्थांना शासनाने मान्यता दिली होती. या शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीची पडताळणी करणे, खासगी अनुदानित शाळांचे लेखा परीक्षण करणे, त्रैमासिक, मासिक अहवाल अर्थसंकल्प पुणे येथे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या संचालकांकडे पाठवणे आदी कामे लेखाधिकारी कार्यालयाकडे सोपवण्यात आली होती. बुलडाणा जिल्ह्यासाठी १९६५ मध्ये हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला. चिखली मार्गावरील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या वसतिगृहात या कार्यालयाला जागा देण्यात आली होती. नंतर बीएडच्या वसतिगृहात टीनशेड टाकलेल्या जागेत हे कार्यालय स्थलांतरीत झालेेे. त्यानंतर लेखाधिकाऱ्यांनी वीज जोडणीसाठी शहर विभागाच्या वीज वितरण कार्यालयाकडे अर्ज केला. मात्र, सहाय्यक अभियंत्यांनी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडे देयकांची थकबाकी असल्याने लेखाधिकारी कार्यालयास वीज जोडणी नाकारली. त्यामुळे वर्षभरापासून हे कार्यालय अंधारात असून, कामकाजावरही परिणाम होत आहेे.

पाचहजार शिक्षकांचे होते कामकाज : जिल्ह्यातील४५० खासगी अनुदानित शाळांमधील जवळपास पाच हजार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचे काम या कार्यालयाकडे आहे. अशावेळी या कार्यालयातील गर्दी वाढते. अशावेळी वीजपुरवठा नसल्याने त्रस्त होण्याची अधिकारी कर्मचाऱ्यांवर येते.

डीएड, बीएड वसतिगृहाची वीज जोडणी सहा महिन्यांपूर्वी ४२ हजार ७०० रुपयांच्या थकीत देयकांमुळे बंद केली आहे. देयके भरल्यास लेखाधिकारी कार्यालयाला वीज जोडणी देता येणार आहे. लेखाधिकारी कार्यालय वसतिगृह परिसरात असल्याने वीज जोडणी देण्यास नाकारल्याचे पत्र देण्यात आले आहे. अमोलवाघ, अभियंता, शहर विभाग, वीज वितरण कंपनी

साेमवारी चर्चा होणार
वर्षउलटूनही वीज जोडणी नसल्याने राजकीय नेत्यांनीही प्रयत्न केले. कार्यालयानेही पाठपुरावा सुरूच ठेवला. दरम्यान, गुरुवार, २३ जुलै रोजी सहाय्यक अभियंता अंबाडकर यांच्याशी बोलणे झाले. त्यांनी चर्चा करण्यासाठी सोमवारी बोलावले आहे. त्यामुळे मार्ग निघण्याची चिन्हे आहेत. सी.डी. आराख, लेखाधिकारी

यांनीही केला पाठपुरावा
याकार्यालयास वीज जोडणीसाठी शिक्षक नेते बाळ अयाचित यांनी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्याकडे प्रकरण मांडले. त्यांनीही प्रयत्न केले. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनीही वीज कंपनीच्या अभियंत्याना सांगितले. मात्र, वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीकडून हालचाली झाल्या नाहीत.

"ऑनलाइन'ची कामे करावी लागतात हाताने
लेखाधिकारीकार्यालयाचा कारभार पेपरलेस व्हावा, यासाठी या कार्यालयास दोन संगणक एक लॅपटॉप देण्यात आला. मात्र, वीजपुरवठा नसल्याने या उपकरणांचा उपयोग ऑनलाइन प्रणालीसाठी होत नसल्याने कर्मचाऱ्यांना कामे हातानेच करावी लागत आहेत.

नाहरकत प्रमाणपत्रानेही वीज मिळाली नाही
लेखाधिकारीकार्यालयास १२ फेब्रुवारी २०१४ पासून वीजपुरवठा नाही. त्यामुळे कार्यालयाने वीज जोडणीसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडे २८ ऑगस्ट २०१४ रोजी नाहरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. त्यानंतर अमरावती येथील उपसंचालकांकडून मान्यता घेतली. वीज वितरण कंपनीकडे अर्ज दिला. त्यानंतर २७ मे २०१५ रोजी वीज वितरण कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांनी पत्र पाठवले. त्यामध्ये सरळ वीज जोडणी देता येत नसल्याचे स्पष्ट नमूद आहे.