आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शासनाने दीड वर्षात गुंडाळली पशु धन विमा योजना, आर्थिक बजेटमुळे करण्यात आली बंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देऊळगावमही - मोताळा तालुक्यात १२ जानेवारी २०१६ रोजी पशु धन विमा योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आला होता. मात्र शेतकऱ्यांची हिताची ही पशु धन योजना शासनाच्या उदासीन धोरण आर्थिक बजेटमुळे अवघ्या दीड वर्षातच शासनाने गुंडाळली आहे. यामध्ये शासनाच्या योजनेला शेतकऱ्यांचेदेखील पाठबळ मिळाल्याने योजनेची अशी बिकट अवस्था झाल्याची माहिती आहे.

 

अनेक वेळा शेतकऱ्यांची गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, संकरित दुधाळ जनावरे इत्यादी जनावरांचा आकस्मित तसेच नैसर्गिक मृत्यु झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत असे, मात्र शासनाने शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळण्यासाठी न्यू इंडिया इन्शुरन्स राज्य शासन यांच्यात सामंजस्य करार करून राष्ट्रीय पशुधन विमा योजना सुरू केली. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन विमा योजनेची सुरुवात राज्यस्तरीय शुभारंभ मातृतीर्थ जिल्ह्यातून करण्यात आला. परंतु ही योजना केवळ १५ महिन्यात शासनाच्या उदासीन धोरण तसेच आर्थिक बजेट कोलमडल्याने गुंडाळण्यात आली.


यामध्ये शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. देऊळगावराजा तालुक्यामध्ये ३२ हजार जनावरे आहेत. सदर योजना बीपीएल, अनुसूचित जाती, जमाती इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांकडील जनावरांसाठी नवसंजीवनी ठरणारी होती. मात्र या योजनेची वाटचाल बघता पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला नाही. तर विमा काढलेल्या काही शेतकऱ्यांचा ही योजना लाभदायी ठरली.

 

देऊळगावराजा तालुक्यातील विमा काढण्यात आलेली एकुण ८० जनावरे दगावली असून त्यांना शासनाच्या योजनेतून १२ लाख ५० हजार रुपये विमा मदत वाटप करण्यात आली. शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी अत्यंत महत्वाची अशी योजनेला शेतकऱ्यांची पाहिजे त्या प्रमाणात साथ मिळाल्याने तसेच शासनाच्या उदासीन धोरणामुळे लोकप्रतिनिधीच्या दुर्लक्षितपणामुळे योजना अवघ्या १५ महिन्यातच गुंडाळण्यात आली. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर सातत्याने दुष्काळजन्य परिस्थिती ओढवली आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध योजना शासनाच्या उदासीन धोरणामुळे बंद होत असल्यामुळे शेतकरी शासनाप्रती रोष व्यक्त करत आहेत.

 

योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
या योजनेला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असतांनाही ही योजना शासनाने बंद केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. तसेच खासगी पशु विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे.
- वामनराव शिंगणे, शेतकरी

 

शासनाचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण
शेतकऱ्यांच्याहिताचीपशु धन विमा योजना ही केवळ पंधरा महिन्यात शासनाने गुंडाळली. चांगला प्रतिसाद मिळत असतांना शासनाचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण दिसत यास जबाबदार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन ही योजना सुरू करावी.
- रामेश्वर वाघ, शेतकरी, अंढेरा

 

विमा काढण्यासाठी वरिष्ठांचे आदेश नाही
एप्रिल महिन्यातही योजना बंद झाली असून केवळ पंधरा महिने या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन होणारे नुकसान टाळण्यासाठी ही योजना शासनाने सुरू करावी शासनाचे आदेश आल्यास विमा काढण्यात येईल.
- भरत सांगळे, विस्तार अधिकारी, पं. स.

 

बातम्या आणखी आहेत...