आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेत उपाध्यक्ष, स्वीकृतची धूम, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात निवडणुक हाेण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे गेलेल्या जि‍ल्ह्यातील पाचही नगरपरिषदांमध्ये आता उपाध्यक्ष, वि‍विध समित्यांचे सभापती आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.
राजकीय तज्ज्ञांच्या मते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या तिन्ही पदांना मुहूर्त मिळेल. जि‍ल्ह्यातील अकोट, मुर्तीजापूर, पातूर, बाळापूर तेल्हारा या पाच नगरपरिषदांच्या निवडणुका गेल्या महिन्यात २७ तारखेला पार पडल्या. त्यानंतर दुसऱ्या दि‍वशी म्हणजे २८ नोव्हेंबरच्या मतमोजणीअंती या ठि‍काणच्या नव्या शि‍लेदारांची (नगराध्यक्ष नगरसेवक) यादी घोषित केली गेली.

नगरपरिषदांची यावेळची निवडणूक ही नेहमीपेक्षा वेगळी होती. वि‍जयी झालेल्या नगरसेवकांमधून नगराध्यक्ष निवडण्याऐवजी यावेळी ते थेट नि‍वडले गेले. त्यामुळे नगरसेवकांमधून निवडल्या जाणारे उपाध्यक्ष आणि वि‍विध वि‍षय समित्यांचे सभापतीपद प्राप्त करण्यासाठी आता शर्यती लागल्या आहेत.

अकोट, मुर्तीजापूर आणि तेल्हारा येथे भाजप तर पातूर आणि बाळापूरमध्ये काँग्रेसचे नगराध्यक्ष नि‍वडून आल्याने त्याच पक्षाला उपाध्यक्ष, सभापतीपद आणि स्वीकृत नगरसेवकत्व प्राप्त व्हावे, असे प्रयत्न सुरु आहेत.
बातम्या आणखी आहेत...