आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर पालिकेच्या प्रशासनाची गतिमानता वाढवण्याची गरज,

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - अकोटनगर परिषदेचे प्रशासन कार्यक्षम करून नागरिकांना विविध सेवा-सुविधा अधिकाधिक लोकाभिमुख करणे, त्यासाठी कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून प्रशासनाची गतिमानता वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले दायित्व निष्ठेने पार पाडावे, असे आवाहन पालिकेच्या मुख्याधिकारी गीता ठाकरे यांनी केले.
पालिकेच्या सभागृहात पालिका प्रशासन गतिमान लोकाभिमुख करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, समस्या प्रश्न त्यावरील उपाययोजना या विषयावर आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. चर्चा सत्रात पालिकेचे विभागप्रमुख, कर्मचारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद सहभागी झाले होते.

नागरिकांना मुलभूत सुविधा सेवा प्रदान करताना एक विश्वासार्हता निर्माण करणे, पालिकेकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सकारात्मक झाला पाहीजे .त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असा सूर या चर्चासत्रात उमटला. नगर परिषदेचे उत्पन्न, उपलब्ध मनुष्यबळ, साधन सुविधेचा अधिकाधिक वापर हा शहराच्या विकासासाठी व्हावा, त्यासाठी सुक्ष्म नियोजन कार्यवाही करण्याची गरज या वेळी विषद केली.

कार्यालयीन व्यवस्था, प्रशासकीय शिस्त, वक्तशीरपणा, तत्परता, संवेदनशीलता पारदर्शक कामकाज, नियम अधिनियमाचा कायद्याचा अभ्यास, ड्रेस कोड, सुसंवाद, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, संगणकीय कार्यप्रणाली, अद्यावत अभिलेखे ठेवणे, या सर्व बाबी प्रशासनाची गतिमानता वाढवतात, असे मत या चर्चासत्रात मांडण्यात आले.

नगर परिषदेचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना सूचवण्यात आल्या. त्यासाठी नपच्या मालकीचे भूखंड, जागा विकसित करणे, व्यापार संकुल दुकान गाळ्यांची भाडेवाढ, मालमत्ता कर मुल्यांकन वसुलीवर भर देणे चर्चासत्रातील चर्चेचा मुद्दा अधोरेखित झाला.
मुख्याधिकारी ठाकरे यांनी एक पाऊल स्वच्छतेकडे हे शहर स्वच्छतेचे मिशन हाती घेतले आहे. या मोहिमेला कर्मचाऱ्यांनी पाठबळ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या वेळी घेतला. ही मोहिम स्वतःपासून नप कार्यालयापासून सुरू व्हावी. त्यातून एक चांगला संदेश जाईल, असे मत मांडले. १६ डिसेंबरला शहर स्वच्छता मोहीम प्रभाग क्र.१६ मध्ये प्रारंभ होत आहे. दर्यापूर रोडवरील स्मशानभूमीतून हा शुभारंभ करावा, अशी सूचना मांडली. या सूचनेचे स्वागत झाले. मोहिमेत शहरातील युवक-युवती, लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक शैक्षणिक संस्था, विद्यार्थी शिक्षक, स्काऊटगाईड, छात्रसेना, राष्ट्रिय सेवा योजना यांना सहभागी करून ही लोकचळवळ व्हावी, असे मत व्यक्त केले. या अनुषंगाने मौलिक सूचना केल्या.शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण, शिवरायांचा पुतळा असलेल्या ठीकाणी फ्लेक्स लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करणे, मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटवणे, नप इमारत शाळांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अशा उपयुक्त सूचनांची दखल घेतली.

कामगारांची नियमित आरोग्य तपासणी, श्रमसाफल्य योजनेतून कामगारांचा निवास व्यवस्था करावी, अशी सूचना पुढे आली. शहरातील कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था, मोकाट मृत जनावरे,डुकरांचा वाढता उपद्रव कोंडवाड्याची दुरुस्तीची सांडपाण्याचे ठिकाणी शोष खड्डे करदळी लागवण करणे इत्यादी विषायावर बरीच चर्चा झाली..मोहीमेत शहरातील युवक युवती, लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक शै.संस्था, विद्यार्थी शिक्षक, स्काऊटगाईड,छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना यांना सहभागी करून ही लोकचळवळ व्हावी, असे मत व्यक्त केले. या अनुषंगाने मौलिक सूचना केल्या.

दरमहा अशाप्रकारे चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे. चर्चेत नंदकिशोर हिंगणकर, प्रदीप रावणकार, कविता जोशी, अशोक कथले, गजानन महल्ले, मोहन नाथे, अंबादास लाघे, रुपेश जोगदंड, अ.आरिफ अ.रऊफ, कैलास मेटवाणी, राजेंद्र लांडे, रोशन कुमरे, सुधाकर पिंजरकर, नंदन गेडाम, चंद्रकांत घुगे, ज्ञानेश्वर वाकोडे, महेंद्र राऊत यांनी चर्चासत्रात भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकिशोर हिंगणकर यांनी केले. आभार फैजुल हक यांनी मानले. नप उर्दू शाळा क्र. या शाळेतील शिक्षकवृंदांनी परिश्रमपूर्वक डीजीटल शाळा उपक्रमशील शाळा निर्माण केल्याबद्दल या शाळेचे मुख्याध्यापक अफजल हुसेन आदर्श शिक्षक वृंदाचे या वेळी अभिनंदन केले. पालिका प्रशासन गतिमान लोकाभिमुख करण्यासाठी येणाऱ्या अडचणी, समस्या प्रश्न त्यावरील उपाययोजना या विषयावर चर्चासत्रात विचारमंथन करण्यात आले. या वेळी पालिकेचे विभागप्रमुख, कर्मचारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांची प्रमुख उपस्थिती होती.

चर्चासत्राला परिविक्षाधीन मुख्याधिकारी कविता बोरकर उपस्थित होत्या. त्यांचा कार्यकाल संपल्याने त्यांचा मुख्याधिकारी गीता ठाकरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करून निरोप दिला. नगर परिषदेतील १५ दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस ठरतील. मला खूप काही शिकता आले. हा अनुभव भविष्यात माझे सेवाकालात उपयुक्त ठरेल, असे उद््गार बोरकर यांनी याप्रसंगी काढले.
बातम्या आणखी आहेत...