आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी दुरुस्तीचे काम आज पूर्ण होण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहराला पाणी पुरवठा करणारी ९०० मिलिमीटर व्यासाची खडकी जवळ फुटलेली जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम २४ सप्टेंबर रोजी सायंकाळ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून सोमवार पासून शहराचा पाणी पुरवठा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. 
 
शहराला पाणी पुरवठा करणारी ९०० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी २२ सप्टेंबर रोजी खडकी जवळ फुटली होती. जलवाहिनी फुटल्यामुळे जवळपास ६० लाख लिटर पाणी वाहून गेले. दुपारी एक वाजता जलवाहिनी फुटल्याची बाब लक्षात आल्या नंतर महापालिका पाणी पुरवठा विभागाने सायंकाळी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले. २३ सप्टेंबरला दिवसभर काम सुरु होते. मात्र पूर्ण होऊ शकले नाही. कंत्राटदार फिरोजखान आणि त्यांचे सहकारी सातत्याने जलवाहिनी दुरुस्तीचे काम करीत आहेत. २४ सप्टेंबरला सायंकाळ पर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची शक्यता असून त्या नंतर पाणी पुरवठा सुरु करण्यात येईल. परिणामी सोमवारी नविन शहराला वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा सुरु होईल. परंतु एखादवेळी शनिवारी सायंकाळ पर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यास पाणी पुरवठ्यास एक दिवस आणखी विलंब होऊ शकतो. 
 
बातम्या आणखी आहेत...