आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाच्या सैराट एन्ट्रीने तारांबळ, रस्त्यावरील पाणी अधिकाऱ्यांच्या घरात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील मुख्य रस्त्यांच्या रखडलेल्या कामांचा फटका रविवारी अकाेलेकरांना बसला. गत दाेन-तीन दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसाचा जाेर रविवारी वाढल्याने रस्त्यांवर पाणी तुंबले. यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत हाेती.
जुने शहरातील डाबकी राेड, सिव्हिल लाइन्स, टाॅवर चाैक ते रतनलाल प्लाॅट, दुर्गा चाैक ते अग्रसेन चाैक, अशाेक वाटिका ते सरकारी बगिचा या राेडवरची कामे सुरू अाहेत. पावसाळा लक्षात घेऊन त्या अनुषंगाने नियाेजन हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, त्यानुसार ना नियाेजन झाले ते ना कामांना गती अाली. यंदा पावसाळा वेळेवर दमदार हाेणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला हाेता. मात्र, प्रशासनाने हे गांभीर्याने घेतले नाही. परिणामी अाता पावसाळ्यात प्रशासनाच्या नियाेजन शून्य काराभाराचा फटका नागरिकांना बसत अाहे.

नवीन रस्त्यावर खड्डे
नेहरु पार्क ते रतनलाल प्लाॅट चाैक हा रस्ता काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात अाला. गत काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने रस्त्याच्या कामातील दर्जा चव्हाट्यावर अाला. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून अाले. सिव्हील लाईन्स ते रतनलाल प्लाॅट चाैक या दरम्यान रस्त्याच्या दाेन्ही बाजूला पाणी तुंबले हाेते. दुकानात अालेल्या ग्राहकांना वाहने कुठे उभी करावीत, असा प्रश्न पहला हाेता. त्यामुळे या कामाची चाैकशी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली हाेती.

सायकलच बुडाली
रतनलाल प्लाॅट चाैक ते टाॅवर चाैक दरम्यानचे काम गत काही दिवसांपासून सुरु अाहे. रस्त्याच्या दाेन्ही बाजूला गिट्टी इतर बांधकाम साहित्य पडून अाहे. त्यामुळे रस्ता अरूंद झाला अाहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले अाहे. अशातच रविवारी दिवसभर पाऊस सुरु हाेता. या राेडवर एका ठिकाणी पाण्याचे माेठे डबके साचले. या डबक्यात एका सायकलच बुडली.
एसडीअाे रस्त्यावर
मुख्यडाक घर ते सिव्हिल लाइन्स या दरम्यान झालेल्या सिमेंट राेडची उंची जास्त असल्यामुळे पाणी दुकान, कार्यालये घरात घुसले. अखेर रात्री मनपा प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने निवास्थांची अावार भिंत फाेडून पाणी बाहेर काढले. नंतर रस्त्याच्या जमीन खाेदून पाण्याला वाट माेकळी करून दिली. यासाठी रात्री वाजताच्या सुमारास स्वत: एसडीअाे प्रा. संजय खडसे रस्त्यावर उतरले. त्यांनी पथकाला मार्गदर्शन केले.

नव्याने बांधलेल्या सिव्हिल लाइन रोडच्या बाजुने पाणी साचले.
तेल्हारा | तालुक्यातीलनरसीपूर येथील रुपेश महादेव टवलकार यांचे रविवारी अमरावती जिल्ह्यातील टवरा येथे लग्न होते. लग्नानंतर वर-वधू वऱ्हाडी गावाकडे परतले. मात्र, विद्रुपा नदी आणि पोवरा नाल्याला मोठा पूर आल्याने ते गावात ते जाऊ शकले नाहीत. याबाबत माहिती मिळल्यानंतर वर-वधूसह ५० ते ६० वऱ्हाड्यांची खेलदेशपांडे येथील श्रीराम संस्थानमध्ये निवासाची व्यवस्था करण्यात आली. योगेश शिवराम अंबरते यांनी त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली.

देवरी | अकोटतालुक्यातील वरुळ जऊळका येथील बाबुराव ज्ञानदेव घनबहादूर (वय ४०) रविवारी दुपारी खाई नदीच्या पुरात वाहून गेले. बाबुराव घनबहादूर दुपारी अडीच वाजतादरम्यान घरी परत जात असताना ही घटना घडली. त्यांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाकडून भर पावसात शोध मोहीम सुरू करण्यात आली. दहीहांडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश वनारे, कर्मचारी पातोड, राठोड, चालक वानखडे यांनीही घनबहादूर यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागू शकला नाही.

जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर
आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने नदी, नाल्यांची पातळी वाढली. शिवाय नाल्यातील पाणी नद्यांना जुळल्याने मोर्णा, पूर्णा, विद्रुपा आदी नद्यांना पूर येऊन गेले. मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहू लागल्या, रविवारीच पुर्णेला मोठा पूर येऊन गेला. दुपारी ३.३० ते दरम्यान अकोट मार्गावरील वाहतूक पाऊन तास खोळंबली होती.
अादर्श काॅलनीतील मैदानावर दिवसभर झालेल्या पावसामुळे पाणी साचले हाेते. दरम्यान या परिसरात नागरिकांनी केलेल्या शाेषखड्ड्यांमुळे पाण्याची पातळीही वाढली अाहे. छाया: नीरज भांगे

काहींच्या पेरण्या खोळंबल्या : पावसानेरौद्ररूप धारण केले असून, त्यामुळे राहीलेल्या काही शेतकऱ्यांच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. बहूतांश पेरण्या झाल्या अाहेत.
एसटीच्या फेऱ्या बंद : अकोट,तेल्हारा तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने या मार्गावर फेऱ्या पाठवल्या नाहीत. अकोला मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दी झाली होती. पाऊस ओसरला तर बसेस सोडण्यात येतील, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.


पावसाच्यासैराट एट्रीने रविवारी दिवसभर नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. शुक्रवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर रविवारीही रात्री उशीरापर्यंत कायम होता. तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेली झडी तीन वर्षानंतर पहावयास मिळाली. रविवारी सुटीचा दिवस असल्यामुळे नागरिकांनीही पावसाचा अानंद लूटला. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली.
रविवारी सकाळच्या सत्रात थोडी विश्रांती घेतल्यानंतर दुपारपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू होता. जिल्ह्यातील अकोट, अकोला, मूर्तिजापूर तेल्हारा तालुक्याला पावसाने झोपडून काढले. सातत्याने बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. सायंकाळपर्यंत पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला होता. पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तब्बल तीन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून होते, त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. शहरातील झोपडपट्टी भागात पाणीच पाणी झाले होते. महिनाभरापासून बऱ्यापैकी पाऊस झाल्याने नालाबांध, नाले, डोहामध्ये पाणीसाठा वाढला असून, नद्यांच्या पाण्याच्या पातळीतही वाढ झालेली दिसून आली. शहर परिसरात मान्सूनच्या पावसाने रविवारी सलग चौथ्या दिवशीही जोरदार हजेरी लावल्याने अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचून राहिल्याने वाहतूकही काहीकाळ ठप्प झाली होती. पूर्णा, विद्रुपा नदीसह काही ठिकाणच्या नाल्यांना पूर आल्याने वाहतूक खोळंबली होती.
जनताबाजारात पाणीच पाणी : पावसाळातोंडावर आला की, नालेसफाईचा मुद्दा ऐरणीवर येतो. लाखो रुपये खर्च केल्यानंतरही शहरातील नालेसफाईचा बोजवारा उडालेला स्पष्टपणे दिसून येत आहे. शहराच्या सखल भागातील पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक भागाला तलावाचेच स्वरूप प्राप्त झाले होते. तर जनता बाजारातील अनेक दुकानामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
कचरारस्त्यावर :गटारीच नसल्याने पाण्याचा निचरा होऊ शकत नाही ज्या काही गटारी झाल्या आहेत, त्या निकृष्ट दर्जाच्या असल्याने फुटल्या आहेत. पाणी गटारीबाहेर गेले आहे, कचराकुंडी नसल्याने रस्त्यावर टाकलेला कचरा, रस्त्यातील खड्ड्यात मोकळ्या भागात साचलेले पाणी यामुळे या परिसरात दलदल निर्माण झाली आहे. या परिसरात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...