आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात अखेर शिवसेनेमध्ये फेरबदल; जिल्हा प्रमुखपदी नितीन देशमुख

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - दीर्घप्रतिक्षेनंतर शिवसेनेत फेरबदल झाले असून, रविवारी जिल्हाप्रमुखांसह प्रमुख पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात अाल्या. जिल्हा प्रमुखपदी जि.प.सदस्य नितीन देशमुख यांची वर्णी लावण्यात अाली अाहे.
एका दशकापासून शिवसेनेत माेठे बदल झाले नव्हते. सप्टेंबर महिन्यात संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत हे अकाेल्यात अाले हाेते. त्यांनी शिवसैनिकांशी झाेननिहाय संवाद साधला हाेता. या दाैऱ्यातच त्यांनी शिवसेनेत फेरबदलाचे संकेत दिले हाेते. त्यांनी यंदा डिसेंबर महिन्यात हाेणाऱ्या नगर पािलका अािण पुढील वर्षी फेब्रुवारी मार्च महिन्यात हाेऊ घातलेल्या नगर पािलका निवडणुकांसंदर्भात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली हाेती. पक्ष बांधणीसाठी त्यांनी महापािलकेच्या २० प्रभागांमध्ये ८० शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुखांची नेमणूक करण्याचा अादेश दिला हाेता.

दाेन शहर प्रमुख : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंतर अाता शिवसेनेनेही दाेन शहर प्रमुखांची नियुक्ती केली अाहे. ही नियुक्ती विधानभा मतदारसंघनिहाय करण्यात अाली अाहे.
अकाेला पूर्व शहरप्रमुख पदी अतुल पवनीकर अािण अकाेला पश्चिम शहर प्रमुखपदी राजेश मिश्रा यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. राजेश मिश्रा हे माजी नगरसेवक, माजी शहर प्रमुख विद्यमान उपजिल्हा प्रमुख अाहेत. शहर प्रमुख असताना मिश्रा यांनी तत्कालीन राज्य सरकार मनपा सत्ताधाऱ्यांविराेधात अांदाेलन केले हाेते.

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अशा
माजी जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांची सहसंर्पक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे. मुकेश मुरुमकार-उपजिल्हा प्रमुख (अकाेला पूर्व विधानसभा मदतदारसंघ), बंडू ढाेरे-उपिजल्हा प्रमुख (मूर्तिजापूर बार्शीटाकळी तालुका), दिलीप बाेचे-उपजिल्हाप्रमुख (अाकाेट तेल्हारा तालुका), राजेंद्र पाेहरे-(बाळापूर पातूर तालुका प्रमुख), अकाेला पूर्व शहर संघटक म्हणून तरूण बगेरे अाणि पश्चिम शहर संघटक म्हणून संताेष अनासने यांची नियुक्ती करण्यात अाली.
बातम्या आणखी आहेत...