आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधाची डोळस कथा - संगणक टायपिंग परीक्षेत दिव्यांग नितीनचे नेत्रदीपक यश; जिद्दीने अंधवात्वर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - डोळ्याने दिव्यांग असूनही संगणक टायपिंग परीक्षेत नितिन दाभाडे या विद्यार्थ्याने नेत्रदीपक यश मिळवत डोळस विघार्थ्यांनाही मागे टाकले आहे. “मुकं करोनी वाचालम,पंगूम लंघय ते गिरीम्’ या उक्ती प्रमाणे अकोटच्या नितीन दाभाडे या दृष्टीहीन विद्यार्थ्याने इंग्रजी मराठी या दोन्ही भाषेच्या संगणक टायपिंग परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. 

दृष्टीहीन नितीन दाभाडे या विद्यार्थ्याच्या जिद्दीची ही कथा आहे. त्याला टायपिंग शिकायचे होते. तो श्री नरसिंग मार्गावरील सावरकर टायपिंग केंद्राचे संचालक रवींद्र सावरकर यांना भेटला त्याने टायपिंग शिकण्याची इच्छा व्यक्त केली. सावरकर यांनीदेखील त्याची प्रबळ इच्छा पाहून त्याला संधी दिली. 

नितीनचा मित्र विजय हेंद हा त्याला मजकूर वाचून दाखवत होता. नितीनने टायपिंगचा सराव करणे सुरू केले. त्याचा स्पीड वाढत गेला इंग्रजी मराठी दोन्ही भाषांमधील प्रति मिनीट ३० शब्द या वेगाच्या परीक्षा त्याने पास केल्यात. या यशाबद्दल रवींद्र सावरकर, स्वाती सावरकर, गटविकास अधिकार गजानन सावरकर, विठ्ठल अढाऊ यांनी नितीनचा गुणगौरव केला. रवींद्र सावरकर यांनी त्याला रोख एक हजार रुपये देऊन त्याचा गौरव केला. त्याला परीक्षेसाठी प्रशिक्षण शुल्क पूर्णपणे माफ केले. 

दिव्यांगाचे भांडवल नाही 
निसर्गानेदिव्यांग दिले असताना त्याचे भांडवल करून पैसे कमावणारे काही व्यक्ती समाजात आहेत. दिव्यांगाचे भांडवल दया बुध्दीने काही नागरिक सर्व प्रकारची मदत करतात. त्यामुळे दिव्यांग असणाऱ्या लहान मुलांचा यासाठी फायदा घेतल्याचे उदाहरणे असताना डोळ्यांनी दिव्यांग असणाऱ्या नितीन दाभाडे याने दाखवलेली जिद्द महत्त्वाची आहे. 

मित्रांची समर्थ साथ 
दिव्यांगनितीन दाभाडे याच्या उत्तुंग यशामधे त्याचा मित्र विजय हेंद याची साथ महत्त्वाची आहे. त्याच्या मित्राने संगणकावर टायपिंगचा स्पीड वाढवण्यासाठी मजकुर वाचून दाखवला. हे सातत्य कायम ठेवून त्याने दाभाडे याची टायपिंगची प्रॅक्टिस घेतली. या कामामधे स्वत:चा वेळ खर्च केला, असे त्याचा मित्र विजय याने सांगितले. 

 
बातम्या आणखी आहेत...